MB NEWS-*कै. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खडका येथील कै.राजीव गांधी अनु.जाती जमाती निवासी आश्रम शाळेत गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप*

 *कै. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खडका येथील कै.राजीव गांधी अनु.जाती जमाती निवासी आश्रम शाळेत गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप*

 सोनपेठ, प्रतिनिधी....

         खडका येथील कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्था संचलित कै राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळेत कै. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे व गणवेशाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

        कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे कै. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे हे होते. यावेळी व्यासपीठावर कोषाध्यक्ष ज्ञानोबा मव्हाळे, पोलीस पाटील वैजनाथ यादव, इर्शाद कुरेशी, मुख्याध्यापक डी.एल.सोनकांबळे,राजेश मव्हाळे, वस्तिगृह अधिक्षक डी.एम.माने, इ.एन.हारगिले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.एल.सोनकांबळे यांनी केले तर सहशिक्षक एस.डी. जालमिले कै.राजकुमार मव्हाळे यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव मव्हाळे यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शन केले.



        याप्रसंगी कै. राजकुमार मव्हाळे यांच्या पुण्यतिiथी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या पेन आदी शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन सहशिक्षक आर.बी.जोशी यांनी केले. पसायदानाने समारंभाचा समारोप झाला.कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !