MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेले पत्र प्रचंड व्हायरल*

 *लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती*


*१२ डिसेंबरला आपण एक सोपा आणि साधा संकल्प करणार आहोत, कराल का साध्य ?*

*पंकजाताई मुंडे यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेले पत्र प्रचंड व्हायरल*


बीड । दिनांक ०८।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वहस्ताक्षरात लिहिलेले पत्र प्रचंड व्हायरल झाले आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी आपण एक साधा आणि सोपा संकल्प करणार आहोत तो साध्य करणार का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.


लोकनेते मुंडे साहेब यांची १२ डिसेंबरला जयंती आहे. या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी एक पत्र लिहीले आहे. '१२ डिसेंबर, ३ जून आणि 'दसरा' हे 'तीन' दिवस..आपला वचिंतांचा मेळा न चुकता अधिक शक्तीने होतो. याच संपूर्ण श्रेय, तुम्हाला निस्सिम प्रेम करणाऱ्यांनाच जातं. तुमच्या एवढं सच्च अनोखं नात माझ्या जीवनात कोणतंही नाही.

 प्रत्येक वर्षी गर्दी, मार्गदर्शन, अनेक सामाजिक उपक्रम आपण घेतो. सामुदायिक विवाह सोहळा, महाआरोग्य शिबीर, अपंग- दिव्यांग सेवा, रक्तदान शिबीर, कोविड सेंटर, अतिवृष्टीसाठी मदत फेरी.. अनेक कार्यक्रम आपण केले, अनेक मान्यवर मा. अमित शहा, मुख्यमंत्री, अनेक 'केंद्रीय मंत्री', 'छत्रपती' सर्व गडावर आले. गोपीनाथ गडावर संघर्ष 'उत्थान दिन' साजरे झाले. अनेक दुःखी कुटुंबियांना मदत केली, अनेक रुग्णांचे इलाज झाले. खुप आशिर्वाद कमवले, हे आशिर्वाद काही कमवण्यासाठी नव्हतेच मुळी.., हे चुकीच्या गोष्टी सुधारणं असतील, सुधारण्यासाठी नाही तर त्या गोष्टी आणि प्रवृतीशी स्वतःचे तत्व कायम ठेवून जगण्यासाठी हे आशिर्वाद कामी येतात. संघर्षाची तमा न बाळगता सत्याची धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी कामाला येतात.

  कोणत्याही नात्याविना इतकं प्रेम कसं केलं, तुम्ही साहेबांच्यावर.. आणि काकणभर जास्त माझ्यावर.. नात्याविना प्रेम, माया, आपुलकी ही प्रेमाविना, आपुलकीविना असणा-या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही माझे गुरु, माऊली आणि तुम्हीच माझे लेकरं !

  या १२ डिसेंबर ला एक संकल्प घ्यावा, म्हणते एक.. का? सोपा आणि साधा संकल्प, कराल का साध्य ? असे त्यांनी विचारले आहे.

••••

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार