MB NEWS-आरक्षणाशिवाय निवडणुका होणं हा ओबीसींवर घोर अन्याय - पंकजाताई मुंडे* *इम्पेरिकल डेटा देण्याचं काम राज्य सरकारचं ; अन्यथा ही वेळ आलीच नसती* _निवडणुका पुढे ढकलण्याची केली मागणी_

 *आरक्षणाशिवाय निवडणुका होणं हा ओबीसींवर घोर अन्याय - पंकजाताई मुंडे*



*इम्पेरिकल डेटा देण्याचं काम राज्य सरकारचं ; अन्यथा ही वेळ आलीच नसती*


_निवडणुका पुढे ढकलण्याची केली मागणी_


मुंबई ।दिनांक १५।

सर्वोच्च न्यायालयाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, इम्पेरिकल डेटा देण्याचं काम राज्य सरकारचं आहे. हा डेटा केला असता तर न्यायालयाचा आजचा निर्णय ऐकण्याची वेळ ओबीसींवर आली नसती. आरक्षणाशिवाय निवडणुका होणं हा ओबीसींवर घोर अन्याय आहे असे सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी आज येथे केली.


 ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने तात्काळ अधिवेशन बोलवावे. त्यात इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी निर्धारित वेळ ठरवावी, असेही पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने चालढकल केल्याने आज ही वेळ आहे, त्यामुळे ओबीसींचे मोठे नुकसान झाले आहे. हा संताप ते न बोलता व्यक्त करतील, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारबाबत तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला.


  पत्रकारांशी बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, ओबीसी आरक्षणासाठी जे करता येईल ते करावे. जोपर्यंत ओबीसी प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात निवडणुका घ्या, असे कुठेही म्हटलेले नाही. राज्य सरकारमधले मंत्री ओबीसीसाठी रस्त्यावर उतरू म्हणतात. मग त्यांना निवडणुका पुढे ढकलणे काहीच अशक्य नाही. ओबीसी आरक्षणाचा विषय माझ्यासाठी हा राजकारणाच्या पलीकडचा असून ओबीसींच्या अस्तित्वाचा आहे असे त्या म्हणाल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार