MB NEWS- *भेल सेकंडरी स्कूल येथे स्व. गोपीनाथराव मुंडे जयंती साजरी*

 भेल सेकंडरी स्कूल येथे स्व. गोपीनाथराव मुंडे जयंती साजरी



 (परळी - वै.)

आज दिनांक 12/12/2021 रोजी भेल सेकंडरी स्कूल येथे स्व. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शाळेतमागील चार दिवसांपासून विध्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. सर्व स्पर्धा करोनाचे नियम पाळून घेण्यात आल्या.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विकासरावजी डुबे (शालेय समिती अध्यक्ष), शांतीलालजी जैन (सदस्य), विष्णुपंत कुलकर्णी (सदस्य), अमोल डुबे (सदस्य),  एन. एस. राव (मुख्याध्यापक), परीक्षित पाटील (उपमुख्याध्यापक) तसेच शाळेतील सर्व शिक्षक/शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश्वरी पुरभे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन संध्या अदौडे मॅडम यांनी केले. अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार