MB NEWS-दिव्यांग हे समाजातील शोषित आणि उपेक्षित घटक; त्यांची सेवा ही आपली जबाबदारी -डॉ.संतोष मुंडे दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटपाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा -बाजीराव भैय्या धर्माधिकारी शरद यशवंत अस्मिता अभियाचा डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ

 दिव्यांग हे समाजातील शोषित आणि उपेक्षित घटक; त्यांची सेवा ही आपली जबाबदारी -डॉ.संतोष मुंडे 


दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटपाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा -बाजीराव भैय्या धर्माधिकारी 



शरद यशवंत अस्मिता अभियाचा डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

राज्याचे सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या संकल्पनेतून "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव-शरद यशवंत अस्मिता अभियान" ही योजना सुरु केली असून या अंतर्गत "दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर" आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ आज शुक्रवारी सकाळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अपंगांचे कैवारी डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

उदघाटन प्रसंगी डॉ.संतोष मुंडे म्हणाले की, दिव्यांग हे समाजातील शोषित आणि उपेक्षित घटक आहेत. त्यांचे अनेक प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत. अशा समाजघटकाच्या मदतीला धावून जाणे ही आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहेच. आज जो उपक्रम हाती घेण्यात आला आहे तो त्याच भावनेतून असून याचा शेकडो जणांना लाभ यामाध्यमातून मिळवून दिला जाणार आहे असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यावेळी बोलतांना म्हणाले की, हे अभियान गरजुंना अधिकाधिक लाभदायक ठरावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने नगर परिषद गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली "राष्ट्रवादी मदत कक्ष" स्थापन केले गेले आहे.याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले आहे. 

उदघाटन कार्यक्रम प्रसंगी परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरुण गुट्टे,जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथ सोळंके,माजी उपनगराध्यक्ष आयुब भाई पठाण, माजी नगरसेवक विजयप्रकाश लड्डा,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अण्णा टाक,शहर सरचिटणीस अनंत इंगळे,अजीज भाई कच्छी, रावसाहेब जगतकर, रमेश अण्णा भोयटे, प्रा.शाम दासूद, रवि मुळे, के.डी. उपाडे, गणेश सुरवसे, लाला जान पठाण, शशी बिराजदार, एस.टी. गित्ते  आदींची उपस्थिती होती. उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ येथे आज दि.17 डिसेंबर, 24 डिसेंबर व 7 जानेवारी रोजी "दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर संपन्न होत आहे. या शिबिराच्या अनुषंगाने उपरोक्त तारखांना, उपजिल्हा रुग्णालयात ओ.पी.डी विभागामध्ये, बालरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, व अस्थीरोगतज्ज्ञ हे अपंग व्यक्तींची तपासणी करणार आहेत. याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !