MB NEWS- *भिमा कोरोगाव विजय स्तंभास परळीत मानवंदना*

 *भिमा कोरोगाव विजय स्तंभास परळीत मानवंदना*




परळी(प्रतिनिधी) - भिमा कोरोगाव (पुणे) येथील विजयी स्तंभ प्रतिमेस परळी येथील भिमनगर येथे आज दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9:00 वाजता सामुहिक मानवंदना देण्यात आली.

   सकाळी सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन झाली.आंबेडकरी चळवळीचे प्रतीक असणार्‍या निळ्या झेंड्याचे ध्वजारोहन डाॅ सिध्दार्थ जगतकर यांच्या हस्ते करण्यात आले,त्यानंतर सर्वांनी भिमा कोरैगाव विजय स्तंभास सॅल्युट करुन मानवंदना देण्यात आली.



   यावेळी प्रा विलास रोडे यांनी उपस्थितांना भिमा कोरेगाव येथील घडलेला इतिहास कथन करतांना सांगितले की,कोरेगाव येथील युध्द म्हणजे जातीयवादी मानसिकतेच्या पेशव्यावर केलेला शुर,लढावू महार सैन्यांचा विजय होता तसेच आत्मसन्मानाच्या लढाईची सुरुवात होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भालचंद्र ताटे यांनी केले तर आभार मुंकुद ताटे यांनी केले.या कार्यक्रमास बहुसंख्य नागरीकांची उपस्थीती होती

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार