परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-⬛ 10 रुपयाचे नाणी न स्विकारणार्‍याविरुध्द कारवाई करा ! 🔸 दहा रुपयांसह कोणतीच नाणी बंद झाली नाहीत! अफवांवर विश्वास ठेउ नये - बँकांचा खुलासा

  ⬛ 10 रुपयाचे नाणी न स्विकारणार्‍याविरुध्द कारवाई करा !

🔸 दहा रुपयांसह कोणतीच नाणी बंद झाली नाहीत!

अफवांवर विश्वास ठेउ नये - बँकांचा खुलासा

परळी वैजनाथ / प्रतिनिधी. .............

    चलनातील कोणतीही नाणी बंद झालेली नाहीत किंवा बंदही होणार नाहीत. या बाबतीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेउ नये. पाच, दहा रुपयांची नाणी चलनातच राहणार आहेत असा खुलासा राष्ट्रीयीकृत बँकांनी केला आहे.

         सध्या बाजारात दहा रुपयांची नाणी चालणार नसल्याची अफवा जोरदार पसरली गेली व त्यामुळे ही नाणी स्विकारली जात नसल्याचे दिसते.या अफवेने नागरिकांनी आपल्या जवळील दहा रुपयांची नाणी बँकांमध्ये जमा करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. तसेच अनेक छोट्या व्यापाऱ्यांनी ही नाणी घेण्याचे बंद केले आहे. नागरिकांनी ही  नाणी स्विकारायला नकार द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारपेठेत दहाची नाणी चलनातून बंद जवळपास बंद झाली आहेत.

              दरम्यान या बाबत आमच्या प्रतिनिधीने स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ही निव्वळ अफवा असून चलनातील कोणतीही नाणी बंद झालेली नाहीत किंवा बंदही होणार नाहीत. या बाबतीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेउ नये. पाच, दहा रुपयांची नाणी चलनातच राहणार आहेत असे स्पष्टीकरण दिले आहे.

    @@@@

  अफवा पसरविणारांवर कारवाई करावी...

                       रिझर्व्ह बॅंकेने नाणी बंद बाबतीत कोणताही निर्णय घेतला नाही. कोणतेही निर्देश दिलेले नाही. असे असताना विनाकारण अफवा पसरवून नागरिकांना भयभीत करण्याचा हा प्रकार आहे. अर्थिक विषयांच्या बाबतीत अफवा पसरवून लोकांत बिनबुडाची व   चुकीची माहिती पसरविणारांवर कठोर कारवाई करावी तरच असे प्रकार बंद होतील अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.शहरासह जिल्ह्यात दैनंदिन व्यवहारात दहा रुपयांची नाणी न स्विकारणार्‍या दुकानदारांसह विक्रेत्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!