MB NEWS-परळी मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे 62 कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमीपूजन*

 * परळी मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे 62 कोटींच्या रस्त्यांच्या कामांचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमीपूजन*



*विकासकामांना केंद्राचा निधी खेचून आणा, आम्ही स्वागत करू विकासाचे राजकारण करा, विकासात राजकारण आडवे आणू नका - धनंजय मुंडे यांचा भाजप नेतृत्वाला सल्ला*


परळी (दि. 16) ---- : परळी मतदारसंघात ग्रामीण भागात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत विविध गावांतील महत्वाच्या सुमारे 62 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमीपूजन होत आहे. 


सकाळी 9 वाजल्यापासून अखेरचे वृत्त हाती आले तोपर्यंत परळी तालुक्यातील देशमुख टाकळी, कौडगाव साबळा, बोरखेड, तेलसमुख, जयगाव, पांढरी तांडा, भिलेगाव, कावळ्याची वाडी या गावातील रस्त्यांच्या कामांचे भूमीपूजन कोविड निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या व मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते.


यावेळी मागील 5 वर्षांच्या काळात या रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर झाला असल्याच्या भाजपच्या दाव्याचा धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना चांगलाच समाचार घेतला. मागील सरकारच्या काळात या रस्त्यांना किंवा जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळाली होती तर मग ती कामे का झाली नाहीत? महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर जुन्या कामांच्या मान्यता रद्द झाल्या होत्या. त्यानंतर आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून नव्याने प्रशासकीय मान्यता घेऊन निधी मंजूर करून आणला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 


बीड जिल्ह्यात अजूनही केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार आहेत, त्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात व परळी मतदारसंघात आणखी विकास निधी खेचून आणावा, आम्ही त्यांचे स्वागत करू; भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने विकासाचे राजकारण करावे, विकासाच्या कामात राजकारण आडवे आणू नये, असा सल्लाही धनंजय मुंडे यांनी भाजप नेतृत्वाला दिला आहे. 


दरम्यान परळी मतदारसंघातील  सुमारे 20 गावांना महत्वाच्या राज्य मार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या जवळपास 62 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न होत आहे. 


या दौऱ्यात ना. मुंडे यांच्यासह आ. संजयभाऊ दौंड जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रा.कॉ. चे तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. गोविंद फड, सूर्यभान नाना मुंडे, पंचायत समितीचे सभापती बालाजी मुंडे, उपसभापती जानिमिया कुरेशी, माणिकभाऊ फड, जिल्हा परिषद सदस्य प्रा. डॉ. मधुकर आघाव, राजाभाऊ पौळ, माऊली तात्या गडदे, रामभाऊ कोपनर, वसंतराव राठोड, प्रभाकर पौळ, सूर्यकांत फड, भाऊसाहेब नायबळ, माधवराव नायबळ,  माऊली तात्या गडदे, विष्णुपंत देशमुख, चंद्रकांत कराड, ज्ञानेश्वर साबळे, राम किरवले, राजाभाऊ निर्मळ, संजय जाधव, बाळासाहेब जाधव, सुभाष नाटकर, विजय मुंडे, विशाल श्रीरंग, सतीश सलगर, नामदेव वानखेडे, भागवत कदम, भागवत देशमुख, गोविंद कराड यांसह उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कोकणे, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर व वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !