इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-वैद्यकीय शिक्षणातील ओबीसी आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत* *असाच निर्णय राजकीय आरक्षणाबाबत लागावा - पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केली अपेक्षा*

 *वैद्यकीय शिक्षणातील ओबीसी आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत*

*असाच निर्णय राजकीय आरक्षणाबाबत लागावा - पंकजाताई मुंडेंनी व्यक्त केली अपेक्षा*


मुंबई ।दिनांक ०७।

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना २७ टक्के आणि आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याला सुप्रीम कोर्टाने आज मंजुरी दिली, या निर्णयाचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी स्वागत केले आहे, असाच निर्णय राजकीय आरक्षणाबाबतही लागावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.


 वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. तसंच आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षणालाही सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दाखवला आहे.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने नीट-पीजी समुपदेशन प्रक्रिया रखडली असल्याने ही प्रक्रिया लवरकच सुरू होणे महत्वाचे असल्याचं नमूद करत या प्रकरणावर कोर्टाने आज निर्णय दिला आहे. दरम्यान, पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत या निर्णयाचे  स्वागत केले आहे, पण त्याचबरोबर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीतही असाच निर्णय लागावा असे त्यांनी म्हटलं आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट