MB NEWS- *पत्रकार अनंत उर्फ पप्पू कुलकर्णी यांची उपसंपादक पदी निवड; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव*

 *पत्रकार अनंत उर्फ पप्पू कुलकर्णी यांची उपसंपादक पदी निवड; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव*

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

        येथील सर्वपरिचित पत्रकार अनंत उर्फ पप्पू कुलकर्णी यांची बीड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या अग्रगण्य दैनिक दिव्य लोकप्रभाच्या उपसंपादक पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

         पत्रकार अनंत उर्फ पप्पू कुलकर्णी हे परळी शहरात सर्वपरिचित पत्रकार म्हणून ओळखले जातात. गेल्या पंधरा वर्षापासून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या विविध अनुभवात ते पारंगत असून सर्व स्तरातील मान्यवरांच्या निकटचे पत्रकार म्हणून ते ओळखले जातात. आजपर्यंत त्यांनी विविध दैनिकांमध्ये काम केलेले आहे. सोलापूर येथील दैनिक संचार, विवेक सिंधू, झुंजार नेता यासह विविध माध्यमातून त्यांनी सक्रिय पत्रकारिता केली आहे.  साप्ताहिक परळी संचार चे ते संपादक म्हणूनही काम करतात. त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची पावती म्हणून बीड जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिक असलेल्या दिव्य लोकप्रभामध्ये त्यांची उपसंपादक पदावर निवड झाली आहे. नुकतीच त्यांच्या निवडीची घोषणा दिव्य लोकप्रभा चे संपादक संतोष मानुरकर यांनी केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल परळीतील पत्रकार बांधव, मित्रपरिवार, ब्राह्मण बहुद्देशीय सभा, पेशवा युवा मंच, ब्राह्मण युवक आघाडी, समर्थ प्रतिष्ठान आदींच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !