MB NEWS-⬛ *गौरवास्पद:परळीच्या भूमीपुत्राचा होणार गौरव; शामसुंदर सोन्नर यांच्या पुस्तकाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार*

 ⬛ *गौरवास्पद:परळीच्या भूमीपुत्राचा होणार गौरव; शामसुंदर सोन्नर यांच्या पुस्तकाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      पत्रकार,लेखक, प्रबोधनकार व वारकरी कीर्तनातून संविधानाचा जागर घालणार्या हभप शामसुंदर महाराज सोन्नर या परळीच्या भूमीपुत्राचा  गौरव होणार आहे.त्यांच्या पुस्तकाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

      परळी तालुक्यातील वडखेल येथील मुळ रहिवासी असलेले व विविध माध्यमातून विचारांचा जागर घालणारे  हभप शामसुंदर महाराज सोन्नर यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.किर्तन, व्याख्यान व पत्रकारिता या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रबोधन, संविधान जागर यासाठीच वाहून घेतलेले आहे. त्यांनी लिहिलेले "भेदा भेद भ्रम अमंगळ" हे पुस्तक अतिशय लोकप्रिय ठरलेले आहे.त्यांच्या कवितांनी तर विधिमंडळातही दाद मिळवलेली आहे.विविध माध्यमातून काम करताना समाजप्रबोधन हा मुख्य हेतू त्यांच्या कार्यातून दिसतो. त्यांच्या "भेदा भेद भ्रम अमंगळ" या पुस्तकाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा जय हिंद प्रकाशन पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. पत्रकार दिनाचे औचित्य साधून 6 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी, मुंबई इथे पुरस्कार कार्यक्रम होणार आहे.या यशाबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.परळी तालुक्यासाठी ही गौरवाची व‌‌‌ अभिमानाची बाब आहे.परळीतील पत्रकार बांधवांनी या पुरस्कारासाठी हभप शामसुंदर महाराज सोन्नर यांचे अभिनंदन केले आहे.


          


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !