style="font-size: x-large;"> 🔸 *सिरसाळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच......!*
🔸 *_चक्क पतसंस्थेची तिजोरी फोडुन मोठा हात मारायचा प्रयत्न_*
परळी वैजनाथ/प्रतिनिधी......
सिरसाळा परिसरात दररोज नोंद होत असलेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे.परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे.सिरसाळ्याच्या परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दि.१० च्या पहाटेच्या सुमारास सिरसाळा येथील एका पतसंस्थेची खिडकी तोडून आत प्रवेश करुन तिजोरी फोडुन चक्क मोठा हात मारण्याचा अयशस्वी प्रयत्न दोन अज्ञात चोरट्यांनी केला.या घटनेने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे
सध्याच्या काळात सर्वत्र चोरीच्या घटननांची साखळी खंडीत होत नसल्याने लोकांमध्ये एकप्रकारे मोठा धसका बसलेला आहे.अन्य कोणत्याही बाबींचा विचार न करता चोरीच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाचे प्राधान्य आहे.अशाही परिस्थितीत चोरट्यांची मनस्थिती मात्र बदललेली दिसत नाही.सर्वत्र चोरटे धुमाकूळ घालत आहेत. दररोज चोरीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होत आहे.काल (दि.१०) परळी तालुक्यातील सिरसाळा येथे संभाजीराजे महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था येथे रात्रीच्या सुमारास अनोळखी दोन इसम खिडकीचे गज तोडुन घुसले. वीज व सीसीटीव्ही कॅमेरॅंच्या वायर तोंडुन टाकल्या. तिजोरीच्या रुममध्ये जावून गॅसकटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये चोरट्यांना यश आले नाही.याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक रंजीत नामदेव पालकर यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.शि.मिसाळ हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा