MB NEWS-मुलींच्या लग्नाच्या वयात केलेली वाढ योग्य - डॉ. शालीनी कराड* *लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन २०० विद्यार्थिनींची सीबीसी तपासणी*

 मुलींच्या लग्नाच्या वयात केलेली वाढ योग्य - डॉ. शालीनी कराड*

 *लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन २०० विद्यार्थिनींची सीबीसी तपासणी*

परळी वैजनाथ दि.०७ (प्रतिनिधी)   

         देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलींच्या लग्नाच्या वयात केलेली वाढ योग्य आहे.तो निर्णय अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. शालीनी कराड यांनी शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात शुक्रवारी (ता.०७) आयोजित आरोग्य शिबीरात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना केले.

            येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सावित्री ते जिजाऊ सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियानांतर्गत विद्यार्थिनीसाठी महाविद्यालयात तालुका आरोग्य विभाग व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. शालीनी कराड बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, डॉ. शालिनी कराड,कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना डॉ. कराड म्हणाल्या की, मुलींनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, रुबेला सारख्या लस मुलींसाठी आहेत. त्या त्यांनी घेतल्या पाहिजेत विद्यार्थिनींनी स्वतःच्या

आहाराकडे लक्ष दिले पाहिजे, फास्टफूड सारखे खाणे टाळून योग्य आहार घेणे आवश्यक आहे. मासिकपाळी दरम्यान स्वतःच्या स्वच्छतेकडे लक्ष देवून काळजी घेतली पाहिजे. तसेच शारीरिक हालचाली बरोबरच मैदानी खेळासह इतर खेळ खेळणे गरजेचे आहे. अन्याय अत्याचार सहन करु नका, प्रतिउत्तर द्यायला शिका,मुलींनी स्वतःच संरक्षण केले पाहिजे.१८ वर्षावरुन लग्नाचे वय २१ वर्षे करणे योग्य असल्याचे मत डॉ. कराड यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रा.प्रसाद देशमुख यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोमल पितळे, प्रास्ताविक प्रा.फुटके यांनी तर आभार प्रा.नव्हाडे यांनी मानले. दरम्यान महाविद्यालय व आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबीरात २०० च्या वर विद्यार्थिनींची सीबीसी तपासणी करण्यात आली. यास आरोग्य विभागाचे तंत्रज्ञ श्री.वाघमारे, श्री.कुकडे यांनी सहकार्य केले. या दोन्ही कार्यक्रमास महाविद्यालयाती कनिष्ट विभागाचे प्राध्यापक, प्राध्यापीका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !