MB NEWS-स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे यांना समाजभूषण पुरस्कार केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते प्रदान

 स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे यांना समाजभूषण पुरस्कार केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते प्रदान 

परळी : एमबी न्युज वृत्तसेवा...

वंजारी सेवा संघातर्फे पूणे येथे झालेल्या  राज्यस्तरीय मेळाव्यास नाशिकसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधवांनी  सहभाग नोंदवला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते  संत साहित्याचे अभ्यासक, श्री सिध्दी विनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक, अध्यक्ष स्वामी डॉ. तुळशीराम गुट्टे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


 याप्रसंगी यूपीएससी, एमपीएससीतील गुणवंत, समाजभूषण पुरस्कार वितरण करण्यात आले. डॉ. गुट्टे महाराज वयाच्या १२ व्या वर्षापासून आध्यात्मिक, सामजिक कार्याचा वसा जोपासत आहेत. प्रवचन, कीर्तन, भागवत, रामायणवर मार्गदर्शना बरोबरच शाळा, महाविद्यालय, विद्यापीठात त्यांची अनेक विषयांवर व्याख्याने झाली आहेत. नाशिकमध्येही त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ वर्षापासून संत ज्ञानेश्र्वर संजीवन समाधी सोहळा, गुरू पौर्णिमा  व गणेश जयंती सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि देशभरात श्री सिध्दी विनायक मानव कल्याण मिशनतर्फे अध्यात्मिक आणि समाजपयोगी उपक्रम घेण्यात येतात. त्यांची मोठी साहित्य संपदा असून, यापूर्वीही त्यांना राज्य, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहेत. याच कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देण्यात आला. 

 मेळाव्याला त्यांनी आशीर्वादरूपी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास  राज्याचे  गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड ,धुळे महापौर प्रदीप करपे यांच्यासह इतर मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित होते. वंजारी सेवा संघ संस्थापक श्री.राहुलजी जाधवर,महिला आघाडी प्रदेश राज्याध्यक्ष डॉ.मंजुषा दराडे,  व सेवा संघ पदाधिकारी , समाज बांधव उपस्थित होते. 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !