MB NEWS-वाल्मिक अण्णांच्या दीर्घायुष्यासाठी तुळजा भवानीच्या चरणी साकडे नगरसेवक गोपाळ आंधळे यांची पायी यात्रा संपन्न

  वाल्मिक अण्णांच्या दीर्घायुष्यासाठी तुळजा भवानीच्या चरणी साकडे 


नगरसेवक गोपाळ आंधळे यांची पायी यात्रा संपन्न 


परळी (प्रतिनिधी)

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक तथा नगर पालिकेचे गटनेते मा.वाल्मिक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक गोपाळ आंधळे हे येडसी ते तुळजापूर आशी पायी यात्रा केली. रविवारी पहाटे प्रभू वैद्यनाथांच्या चरणी नतमस्तक होत या यात्रेची  सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर येरमाळा येथे येडेश्वरी देवीची खना-नारळाने ओटी भरून साकडे घालण्यात आले. 

नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी रविवारी येडशी ते तुळजापूर असा 43 किमीचा पायी प्रवास केला. नगर पालिकेचे गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त ही पायी यात्रा करण्यात आली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या माता तुळजाभवानीचे सोमवारी दर्शन घेण्यात आले. दर्शन घेऊन देवीची खना-नारळाने ओटी भरून अण्णांच्या दीर्घायुष्यासाठी देवीला साकडे घालण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, पत्रकार धनंजय आढाव, महादेव शिंदे, संजीब रॉय, हनुमान आगरकर, अर्जुन साखरे, नामदेव पाथरकर, बालाजी टाक, विजय पोखरकर,सोमनाथ आंधळे  आदींसह अनेकांचा सहभाग आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !