MB NEWS- *राज्यात शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील होणार सुरू* *सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय*

 *राज्यात शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील होणार सुरू*


*सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय*


*त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक प्राधिकरणाच्या नियमावलीला अनुसरून वसतिगृहे सुरू करण्याचे निर्देश*


मुंबई (दि. 21) ---- : राज्यात सोमवार दि. 24 जानेवारी पासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू होत असून, शाळांच्या पाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील सुरू करण्यात यावीत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.


महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या-त्या ठिकाणी कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा व त्याला अनुसरून सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे व निवासी शाळा सुरू करावीत तसेच यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिले आहेत.


राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. अनेक ठिकाणी कोविडची परिस्थिती आटोक्यात येत असून, सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहांमध्ये व निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत, त्या-त्या स्थानिक प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाने स्थानिक नियमावलीला अनुसरून व आवश्यक काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !