MB NEWS-⭕ *भोगी आणि एकादशी एकाच दिवशी ; उपवासाबाबत सुवासिनींमध्ये संभ्रम*⭕ 🔸*_पंचांगकर्त्यांनी केला 'हा' महत्त्वपूर्ण खुलासा_*

  ⭕ *भोगी आणि एकादशी एकाच दिवशी ; उपवासा बाबत सुवासिनींमध्ये संभ्रम*⭕

🔸*_पंचांगकर्त्यांनी केला 'हा' महत्त्वपूर्ण खुलासा_*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

       यावर्षी दि 13 जानेवारी ला गुरुवारी भोगी सण असून त्याच दिवशी एकादशी पण आहे . त्यामुळे भोगीचे पदार्थ सेवन करायचे की एकादशीचा उपवास करायचा याबाबत सुवासिनींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.मात्र याबाबत पंचांगकर्ते दाते यांनी खुलासा केला आहे.उपवासाबाबत संभ्रम न ठेवता ज्यांना उपवास आहे त्यांनी उपवासाचे पदार्थ खाऊन भोगी साजरी करावी असे असे त्यांनी म्हटले आहे.

       भोगी’ हा सण मकरसंक्राती या सणाच्या आदल्या दिवशी येतो. भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा. या सणाच्या दिवशी घर तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करुन घराच्या अंगणाभोवती रांगोळी काढण्यात येते. तसेच घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे. यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही, असे बोले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात.

🕳️ *हे आहे या सणाचे महत्व*

           जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण हा भोगी असतो. या महिन्यात हिवाळा देखील असतो. विशेष म्हणजे या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. तसेच शेताला नवीन बहार आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास विसावा लागतो. दरम्यान, या भोगी सणानिमित्त शेतकरी भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) आणि त्यासोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे भोगीची भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. मात्र, ती करण्याच्या पद्धतीत थोडाबहुत फरक असतो. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजीही तिळाचा कूट घालून केली जाते. या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण महत्त्वाचा असून हा सण बऱ्याच व्यक्ती साजरा देखील करतात.

⬛ 

 यावर्षी दि 13 जानेवारी ला गुरुवारी भोगी सण असून त्याच दिवशी एकादशी पण आहे . भोगी चा सण करताना वाण- वसा करता येतो *मात्र ज्यांना एकादशी चा उपवास आहे त्यानी उपवसास चालणारे पदार्थ खावेत त्यामध्ये तिळगूळ खाता येतोआणि ज्यांना उपवास नाही त्यांनी भोगीचे पदार्थ खावेत 

                           - मोहन दाते, पंचांगकर्ते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार