MB NEWS-*सौ.अर्चना मधुकर गित्ते यांची पीएचडीसाठी निवड*

  *सौ.अर्चना मधुकर गित्ते यांची पीएचडीसाठी निवड*

परळी (प्रतिनिधी)... डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडी साठी परळी येथील सौ. अर्चना मधुकर गीत्ते- नागरगोजे यांची निवड झाली आहे. विद्यापीठाच्या वतीने पीएचडीसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांच्या निवड यादीत त्यांचा समावेश झाला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

    सौ. अर्चना मधुकर गीत्ते या गेल्या अनेक दिवसापासून प्राध्यापक म्हणून काम करतात. त्याचप्रमाणे येथील यशवंतराव चव्हाण क. महाविद्यालयात प्राचार्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या पीएचडी पूर्व परीक्षेत घवघवीत यश संपादन करून त्यांची निवड पीएचडी या उच्चश्रेणी अभ्यासक्रमासाठी झाली आहे. प्राणीशास्त्र या विषयात त्या पीएचडी करणार आहेत. परळी वैजनाथ ता. परळी वैजनाथ, जि. बीड (महाराष्ट्र) मधील कासारवाडी जलाशयातील भौतिक-रासायनिक मापदंड आणि त्याचा अभ्यास या विषयावर संशोधन करुन प्रबंध सादर करणार आहेत. त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. डी. बी. शिरसाट यांचे  मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

  1. अभिनंदन प्राचार्य अर्चना ताई डॉक्टर पदवी प्राप्त होण्यासाठी आपण खूप खूप मेहनत घेऊन उत्तुंग भरारी घेणार यात शंका नाही. अनेक अनेक हार्दीक हार्दिक शुभेच्छा.
    तुझे सासू सासरे व सर्व गीते
    परिवार

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !