MB NEWS-जिल्हा परिषद शाळा तडोळी येथे शालेय साहित्याचे वाटप

 जिल्हा परिषद शाळा तडोळी येथे शालेय साहित्याचे वाटप

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 

       मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष  ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजी ब्रिगेड परळी वै शाखेच्या वतीने तडोळी जिल्हा परिषद शाळेमध्ये आज शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 

           शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेला गुणीजन शिक्षक लाभल्याबद्दल सर्वप्रथम मुख्याध्यापक बापूराव चव्हाण, सर सहशिक्षक शिवम गीते सर, शिक्षक शेख सर यांचा  सत्कार करण्यात आला. तडोळी गावातील विद्यार्थी मनोहर धनराज सातभाई याची नेव्ही मध्ये नुकतीच निवड झाली. या प्रसंगी त्याने आपले मनोगत व्यक्त करून शिक्षण घेताना आलेल्या आर्थिक मानसिक अडचणी याचा सामना करून विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सेवकराम जाधव यांनी व्यसनमुक्तीचा संदेश देऊन शिक्षणाकडे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे तसेच कला गुणांकडे पालकांनी  लक्ष देण्यासह अनेक विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद शाळांकडे शासनाचे अजिबात लक्ष नसल्याचे देवराव लुगडे महाराज यावेळी म्हणाले.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तडोळी गावचे सरपंच  अशोक शिरसाट, हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये गावचे उपसरपंच  वैजनाथराव सातभाई, ग्रामपंचायत सदस्य  भगवान सातभाई ,ग्रामपंचायत सदस्य शिवश्री प्रभाकर सटाले,  हरिभाऊ सातभाई, दौलत सातभाई, सहदेव सातभाई, भिमराव सातभाई, मानिकराव सटाले,  शिवचंद्र लुगडे, धर्मराज सातभाई, शिवश्री ओमकार सातभाई,  सचिन सातभाई, प्रदीप सातभाई उद्धवराव सटाले, अमोल सातभाई, कृष्णा सातभाई यासह गावातील मान्यवर  जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार