MB NEWS-अविनाश मुडेगांवकर यांना मराठवाडा स्तरीय शोध पत्रकारिता पुरस्कार जाहीर*

 *अविनाश मुडेगांवकर यांना मराठवाडास्तरीय शोध पत्रकारिता पुरस्कार जाहीर*



अंबाजोगाई-:उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा मराठवाडा स्तरीय शोधपत्रकारिता पुरस्कार अंबाजोगाई येथील लोकमत चे तालुका प्रतिनिधी अविनाश मुडेगांवकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


              उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गेल्या  बारा वर्षापासुन मराठवाडास्तरिय उत्कृष्ठ वार्ता व शोध वार्ता या दोन गटातून पुरस्काराचे आयोजन केले जात असुन पुरस्काराचे हे तेरावे वर्ष आहे. या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात 

शोध वार्ता गटात 

प्रथम पुरस्कार

दैनिक लोकमतचे अंबाजोगाई  येथील प्रतिनिधी अविनाश मुडेगावकर यांच्या 'जिवावर उदार होऊन ४००रु रोजाने करतात काम ' या बातमीस अर्जून मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५ हजार रु रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.  

        अविनाश मुडेगांवकर हे गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. पत्रकारितेतील कै.अनंतराव भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार,स.मा.गर्गे पत्रकारिता पुरस्कार या मोठया पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत.दै.लोकमत मधील अनेक सन्मानाचे पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत.अविनाश मुडेगांवकर यांच्या पत्रकारितेची सुरुवात दै.सर्वसाक्षी पासुन झाली.पुढे दै.अजिंठा,दै.विवेक सिंधु,गांवकरी,सोलापुर तरुण भारत व लोकमत असा त्यांचा प्रवास आहे.गेल्या १६ वर्षांपासून लोकमत मध्ये आपल्या लेखणीच्या माध्यमातून स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.अविनाश मुडेगांवकर यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार