MB NEWS-वाल्मिक अण्णांच्या दीर्घायुष्यासाठी गोपाळ आंधळे यांची येडसी ते तुळजापूर पायी दिंडी प्रभू वैद्यनाथांचे आशीर्वाद घेऊन सुरुवात; श्रीदादा कराड यांनी दिल्या शुभेच्छा

.  वाल्मिक अण्णांच्या दीर्घायुष्यासाठी गोपाळ आंधळे यांची येडसी ते तुळजापूर पायी दिंडी 


प्रभू वैद्यनाथांचे आशीर्वाद घेऊन सुरुवात; श्रीदादा कराड यांनी दिल्या शुभेच्छा 



परळी (प्रतिनिधी

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या विकास रथाचे सारथी तथा  नगर पालिकेचे गटनेते मा.वाल्मिक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक गोपाळ आंधळे हे येडसी ते तुळजापूर आशी पायी दिंडी करत आहेत. प्रभू वैद्यानाथांचे आशीर्वाद घेऊन या पायी दिंडीला सुरुवात झाली. वैद्यनाथांच्या पावन भूमीतून प्रस्थान होत असतांना निरोप देतेवेळी वाल्मिकअण्णा कराड यांचे चिरंजीव श्रीदादा कराड, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, पत्रकार धनंजय आढाव, महादेव शिंदे, संजीब रॉय आदी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी गोपाळ आंधळे यांच्या पायी दिंडीला शुभेच्छा दिल्या.

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे नगर पालिकेचे गटनेते मा.वाल्मिकअण्णा कराड यांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी माता तुळजाभवानीला साकडे घालण्यात येणार आहे. त्यासाठी येडसी ते तुळजापूर पायी यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत प्रभाग क्र.5 मधील हनुमान आगरकर, अर्जुन साखरे, नामदेव पथरकर, बालाजी टाक, विजय पोखरकर आदींसह अनेकांचा सहभाग आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार