MB NEWS-धुकं चढलं हरभर्याच्या झाडावर.........! वाढत्या धुक्याची हरभरा व ज्वारी पिकांवर संक्रांत

  धुकं चढलं हरभर्याच्या झाडावर.........!



वाढत्या धुक्याची हरभरा व ज्वारी पिकांवर संक्रांत


परळी वैजनाथ / प्रतिनिधी .......

        गेल्या चार दिवसांपासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. आज (दि.१७)  शहरासह सर्वत्र थंडीचा जोर आणखीनच वाढला होता. पहाटेच्या वेळी शहरावर धुके पसरलेले होते. उजेडता उजेडता नागरीकांना गडद धुक्याचा अनुभव आला. दाट धुक्याने रस्त्यावर  दृष्यमानता कमी होती वाढत्या धुक्याची हरभरा व ज्वारी पिकांवर संक्रांत आली आहे.त्यामुळे शेतकरी बैचेन झाले आहेत.

         गेल्या चार पाच दिवसापासून  थंडीच्या लाटेने जनजीवन गारठले आहे. तापमानाचा पारा सरासरीने निच्चांकी येत खाली आला आहे. यासोबतच सकाळच्या दाट धुक्यात जनजीवन हरवले आहे. धुक्यामुळे मार्गावर वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. दाट धुक्यामुळे रस्त्यावर  दृश्यमानता कमी झाली. अनेक ठिकाणी सकाळच्या वेळी शेकोट्या पेटलेल्या दिसून आल्या.थंडीत कुडकुडत बसावे लागत असल्याने अनेकांनी आपल्या रस्त्यालगत  शेकोट्या पेटविल्या होत्या.

         बदलत्या वातावरणाचा रब्बी हंगामातील पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.सकाळी पडणारे धुके व ढगाळ वातावरण यामुळे हरभरा व ज्वारी पिकांवर संक्रांत आली आहे.त्यामुळे शेतकरी बैचेन झाले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !