MB NEWS-बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक गौरव: नवगण राजुरीचे अमृताश्रमस्वामींना शंकराचार्य पिठाकडून "धर्मगुरू" उपाधी

 . बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक गौरव: नवगण राजुरीचे अमृताश्रमस्वामींना शंकराचार्य पिठाकडून "धर्मगुरू" उपाधी


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      आपल्या विद्वत्तेजाने व अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतवर्षात बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक क्षेत्रात गौरव वाढविणारे नवगण राजुरीचे अमृताश्रमस्वामींना ( अमृत महाराज जोशी) शंकराचार्य पिठाकडून "धर्मगुरू" उपाधीने अलंकृत करण्यात आले आहे.

      वारकरी संप्रदायातील एक जेष्ठ श्रेष्ठ नाव म्हणून ओळख असलेले अमृताश्रमस्वामींना ( अमृत महाराज जोशी) हे धर्मजागृती व समाजप्रबोधन कार्यात जीवनभर कार्यरत आहेत. अखिल भारतीय स्तरावर साधु,संत, महंत, विविध आखाडे, साधुसमाज व परंपरा यामध्ये वारकरी संप्रदायाचे स्थान मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे.आपल्या विद्वत्तेजाने व अमोघ वक्तृत्वाने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतवर्षात अध्यात्मिक क्षेत्रात बीड जिल्ह्याचा मान वाढवला आहे. यतीधर्म संस्करण झाल्यानंतर दंडीस्वामी म्हणून त्यांनी अमृताश्रमस्वामी हे नामाभिधान धारण केले आहे.महंत, महामंडलेश्वर, अचार्य, द्वाराचार्य आदी अध्यात्मिक उपाधींनी यापुर्वीच त्यांचा गौरव झालेला आहे. आता संकेश्वर पिठाधिश शंकराचार्य अभिनव विद्यानृसिंह स्वामी यांनी त्यांना शंकराचार्य पिठाकडून अधिकृतरित्या "धर्मगुरू" उपाधी बहाल केली आहे.हा बीड जिल्ह्याचा अध्यात्मिक गौरव आहे.नुकताच शंकराचार्य व ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र पैठण येथे हा सोहळा पार पडला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !