MB NEWS-वैद्यनाथ महाविद्यालयात ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न

 वैद्यनाथ महाविद्यालयात ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे लसीकरण संपन्न



परळी वैजनाथ दि.५ -

                येथील जवाहर एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित वैद्यनाथ महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागांतर्गत इयत्ता ११वी व१२वी वर्गात शिकणाऱ्या जवळपास ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे कोवीड लसीकरण नुकतेच पूर्ण झाले. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार महाविद्यालयात दि.३ व ५ जानेवारी रोजी कोरोना  लसीकरण मोहिम राबविण्यात  आली. या मोहिमेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्तपणे  प्रतिसाद मिळाला व त्यांनी आपले लसीकरण करून घेतले. 

                 लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री सोनवणे  यांच्या हस्ते झाले. यावेळी गटविस्ताराधिकारी श्री संजय केंद्रे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे, प्राचार्य डॉ.डी.व्ही. मेश्राम, उपप्राचार्य एस. एम. सूर्यवंशी ,पर्यवेक्षक एस. आर. सूर्यवंशी, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा डी.के. आंधळे आदी उपस्थित होते. 

          प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले केले. प्राचार्य डॉ. मेश्राम यांनी वरील सर्व अधिकाऱ्यांचे महाविद्यालयातर्फे स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी कोरोना लसीकरणाची माहिती सांगून लहान वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण आवश्यक असल्याचे सांगितले.

         ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य एस. एम. सूर्यवंशी परिवेक्षक डॉ. एस. आर.सूर्यवंशी, स्टाफ सेक्रेटरी प्रा. राजेश गोरे, प्रा.डा.अर्चना चव्हाण, प्रा.डा. कोपार्डे, प्रा.डा. राठोड, प्रा. डॉ. व्ही.एल. फड, प्रा. डॉ. वीरश्री आर्य, प्रा. यु. आर. कांदे , प्रा. हरीश मुंडे, प्रा. अरुण ढाकणे, प्रा. रवी कराड, प्रा. सदानंद लोखंडे, प्रा. उमाकांत कुरे इत्यादींनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !