MB NEWS-*डॉ. दंडे यांच्या जाण्याने परळीच्या वैद्यकीय सेवा व सामाजिक चळवळीतील एका निरपेक्ष सेवा पर्वाचा अस्त - धनंजय मुंडे*

 *डॉ. दंडे यांच्या जाण्याने परळीच्या वैद्यकीय सेवा व सामाजिक चळवळीतील एका निरपेक्ष सेवा पर्वाचा अस्त - धनंजय मुंडे*



*परळीतील ज्येष्ठ डॉ. दिगंबर दंडे यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केला शोक व्यक्त*


परळी (दि. 08) - : परळी तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात गेल्या 45 वर्षांपेक्षा अधिक कालावधी निरपेक्षपणे रुग्णांची यशस्वी सेवा करणारे तसेच परळीच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्व ज्येष्ठ डॉ. दिगंबर दंडे यांच्या निधनाने परळीच्या वैद्यकीय सेवा व सामाजिक चळवळीतील एका यशस्वी व प्रदीर्घ पर्वाचा अस्त झाल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.


दीनदयाळ बँकेचे संस्थापक संचालक, डॉ. दिगंबर दंडे यांचे आज दुःखद निधन झाले, त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी शोक व्यक्त केला आहे. 


डॉ. दंडे यांनी स्व. प्रमोदजी महाजन, स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबतीने राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम केले. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास देखील भोगलेला आहे. आम्हाला राजकीय जडणघडणीत अनेकवेळा डॉ. दंडे यांचा सहवास लाभला आहे, असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


अनेक वर्षे परळीतील रुग्णांची सेवा केलेले डॉ. दिगंबर दंडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी डॉ. दंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !