MB NEWS-*डाॅ. दंडे यांच्या निधनाने परिवारातील सदस्याला मुकलो* *ना. पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली*

 *डाॅ. दंडे यांच्या निधनाने परिवारातील सदस्याला मुकलो* 



*ना. पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली* 


परळी दि. ०८ ------  जुन्या पिढीतील नामवंत डाॅक्टर आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांवर अतोनात प्रेम करणारे   डाॅ. दि. ज. दंडे यांच्या निधनाने परिवारातील सदस्याला मुकलो आहोत, त्यांची उणीव आम्हाला नेहमी जाणवत राहील अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. 


   डाॅ. दंडे  हे लोकनेते मुंडे साहेबांचे मित्र तर होतेच शिवाय आमच्या परिवारातीलच एक होते. परळीतील जुन्या पिढीतील प्रसिध्द डाॅक्टर असलेल्या डाॅ. दंडे यांनी अनेक गोरगरीब रूग्णांना बरे केले.  सर्व सामान्य व तळागाळातील लोकांशी त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. भारतीय जनता पार्टीचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते. दीनदयाळ बॅकेचे ते बराच काळ चेअरमन होते,  बॅकेला प्रगतीच्या शिखरावर पोहोचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.  त्यांच्या निधनाने आम्ही परिवारातील सदस्याला मुकलो आहोत. कोरोनामुळे घरातील सर्व जण विलगीकरणात असल्याने त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकत नाही, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !