MB NEWS-बूस्टर डोस आजपासून झाले सुरू;नागरीकांनी लाभ घ्यावा- तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. लक्ष्मण मोरे

 बूस्टर डोस आजपासून झाले सुरू;नागरीकांनी लाभ घ्यावा- तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. लक्ष्मण मोरे

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

         सर्व शासकीय, पालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर आज सोमवार, १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, आघाडीवरील (फ्रंटलाइन) कर्मचारी आणि ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना करोना लशीचा संरक्षक डोस (प्रोटेक्शन डोस) सुरू झाला आहे. या मात्रेसाठी दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून नऊ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. लक्ष्मण मोरे यांनी केले आहे.

           केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कोव्हिड-१९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन तसेच स्टँडिंग टेक्निकल सायन्टिफिक कमिटी यांच्या निर्देशानुसार हे लसीकरण सुरू होणार आहे.शासकीय लसीकरण केंद्रांवर सर्व पात्र नागरिकांना विनामूल्य संरक्षक डोस देण्यात येईल. 

सर्व आरोग्‍य कर्मचारी, आघाडीवर काम करणारे कर्मचारी ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे व ज्यांची कोविन अॅपवर यापूर्वी लस घेताना कर्मचारी ऐवजी 'नागरिक' अशी वर्गवारी नोंद झाली आहे, अशा लाभार्थ्यांचे लसीकरण शासकीय  लसीकरण केंद्रात थेट येऊन (ऑनसाइट/वॉक इन) नोंदणी पद्धतीने उपलब्ध असेल. त्यासाठी त्यांनी नोकरीच्या ठिकाणचे प्रमाणपत्र/ओळखपत्र सादर करणे बंधनकारक असेल.लाभार्थ्यांनी आधी कोव्हिशील्ड लस घेतली असेल तर त्यांना कोव्हिशील्ड, ज्यांनी आधी कोव्हॅक्सिन लस घेतली असेल त्यांना कोव्हॅक्सिन लशीचा डोस देण्यात येईल.नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. लक्ष्मण मोरे यांनी केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !