MB NEWS-*बोधेगाव येथे १५ एकर ऊस जळून खाक, पाच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान* 🔸 _डोळ्यादेखत उभं रान जळताना शेतकर्यांचं ह्रदय तळतळलं_

 *बोधेगाव येथे १५ एकर ऊस जळून खाक, पाच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान*

🔸 _डोळ्यादेखत उभं रान जळताना शेतकर्यांचं ह्रदय तळतळलं_ 


परळी वैजनाथ( प्रतिनिधी) : तालुक्यातील बोधेगाव येथील शेतात उभ्या असलेल्या उसाला अचानक आग लागली. या आगीत जवळपास पाच ते सहा शेतकऱ्यांचा पंधरा एकर ऊस जळून खाक झाला.या आगीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बोधेगाव येथे शुक्रवारी (दि.२१) दुपारी सोनहिवरा  रस्त्यावर तळ्याच्या लगत असलेल्या उसाला अचानक आग लागली. 

      आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरली की, या आगीत जवळपास १५ एकर ऊस जाळून खाक झाला आहे. आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या परिसरातील शेतात लागोपाठ शेजारी ऊस लागवड असल्याने एका शेतातील ऊसाला आग लागल्याने ती मोठ्या प्रमाणात पसरली.यामध्ये बबलू राजेभाऊ शिंदे, सुधाकर रामभाऊ शिंदे, दशरथ नारायण शिंदे, बाळासाहेब नारायण शिंदे, मुंजाभाऊ गुणाजी गडदे आदी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आग लागताच गावकऱ्यांनी ती आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. मात्र आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने शेतकऱ्यांना विझवणे शक्य झाले नाही. ज्ञानोबा माऊली घडले यांनी अग्निशमन दलाला संपर्क साधून माहिती दिली. मात्र शहरातून अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार