इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच...... परळीतील समता नगरात दीड लाखांची घरफोडी; नागरिकांमध्ये दहशत

 चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच......

परळीतील समता नगरात दीड लाखांची घरफोडी; नागरिकांमध्ये दहशत 

 

 परळी वैजनाथ/प्रतिनिधी......

    परळी व परिसरात दररोज नोंद होत असलेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे.परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे. परळीतील समता नगरात घरफोडीची मोठी घटना घडली आहे.या घटनेने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.या घरफोडीत सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

       

      सध्याच्या काळात सर्वत्र चोरीच्या घटननांची साखळी खंडीत होत नसल्याने लोकांमध्ये एकप्रकारे मोठा धसका बसलेला आहे.अन्य कोणत्याही बाबींचा विचार न करता चोरीच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाचे प्राधान्य आहे.अशाही परिस्थितीत चोरट्यांची मनस्थिती मात्र बदललेली दिसत नाही.सर्वत्र चोरटे धुमाकूळ घालत आहेत. दररोज चोरीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होत आहे. दि.५ रोजी परळी जवळील समता नगर भागात  फिर्यादी अंगद गोविंदराव फड ( वय ५५ )यांच्या घरात  रात्रीच्या सुमारास अनोळखी चार इसम घराचे चॅनल गेट तोडुन घरात घुसले. कपाटातील सोन्याचे दागिने, साड्या आदी तब्बल १लाख ५८ हजारांचा ऐवज लंपास केला. ३५ते४९ वर्षे वयोगटातील अज्ञात चार चोरट्यांना घरमालक घडल्याचे लक्षात येताच ऐवज घेऊन पळून जाण्यात यश मिळाले. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.ह.शिंदे हे करीत आहेत.

      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!