MB NEWS- कविता:अतुल राजनाळे......शाळकरी विद्यार्थी

कविता:अतुल राजनाळे......शाळकरी विद्यार्थी


अभ्यासात गांभीर्य नसणार्या ,शाळेत मुळीच अभ्यास न करणार्या विद्यार्थ्यांसाठी कवी अतुल राजनाळे यांनी एक कविता केली आहे.शाळेत असताना अभ्यास न करणार्या व परिस्थिती मजुर  बनलेल्या अशा एका विद्यार्थ्याची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून ही कविता केलेली आहे . 


*चुक फक्त माझी आहे*

जिकडे असेल तिकडे जातो, शोधत हाताला काम,
थोड्याशा पैशासाठी, गाळतो खुप हो घाम 
काल कामात झालेली, जखम अजून ताजी आहे 
अभ्यास नाही केला शाळेत, चूक फक्त माझी आहे 

लावूनी मलम, झाकुनी जखम करावे लागते काम 
तरच मिळते संध्याकाळी, पोटापुरते दाम 
रोज काम केले तरच भाकर संगे भाजी आहे 
अभ्यास नाही केला शाळेत चूक फक्त माझी आहे 

परिस्थिती ही अशी झाली, मदत कोणी करत नाही 
नसते काम ज्या ही दिवशी पोट पुर्ण हो भरत नाही 
कमवणारे मित्रही आहेत म्हणतात मी जरा बीझी आहे
अभ्यास नाही केला शाळेत चूक फक्त माझी आहे 

म्हणुनी सांगतो तुम्हा मुलांनो, अभ्यास तुम्ही करा 
शाळेतच मिळते ज्ञान खरे ते ग्रहण तुम्ही हो करा 
होऊनये कुणाचीही परिस्थिती जी आज माझी आहे 
अभ्यास नाही केला शाळेत चूक फक्त माझी आहे

-अतुल राजनाळे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !