MB NEWS-वसमत-समजा साठी समर्पित होणारा वसमत तालुका पत्रकार संघ - उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ पत्रकार संघाच्या गौरव समारोहात प्रतिपादन

  समजा साठी समर्पित होणारा वसमत तालुका पत्रकार संघ - उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ

पत्रकार संघाच्या गौरव  समारोहात प्रतिपाद

वसमत (प्रतिनिधी)- बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात करून समाजमन एकवटून समाजास एक चागली दिशा देण्याचे कार्याकरत समाजातील चांगल्या वाईट गोष्टी समोर आणून आपल्या दर्पण वृतापात्रातून न्याय देण्याचे कार्य जांभेकर यांनी केले पत्रकारितेचे कार्य हे समाजमनाला दिशा दाखविणे आहे . वसमत येथील पत्रकारांनी सामाजिक,वैद्यकीय,शिक्षण ,क्षेत्रातील प्रसिद्धी पासून दूर परंतु आपले कार्य समाजहितासाठी केले तेच हेरून  पत्रकारांनी त्यांचा गौरव करण्याचा विडा उचलून त्याना गौरविले.यातूनच सर्वांनी याचं आदर्श डोळ्या समोर ठेवून आपल्या कार्याला न्याय द्यावा. वसमतचे पत्रकार समाजमनाला जाणून कार्य करतात हेच त्यांनी या गौरव सोहळ्यातून समाजाला दाखवून दिले असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांनी आयोजित पत्रकार संघाच्या गौरव  समारोहात केले. 

         तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ म्हणाले,आज-काल प्रशासकीय पातळीवर तसेच सामाजिक पातळीवर काम करणे सोपे राहिलेले नाही. मात्र अशा परिस्थितीत सुद्धा समर्पित होऊन सामाजिक कार्य करणाऱ्या अधिकारी आणि सामाजिक जाणीव असणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांचा गुणगौरव करण्याचा स्तुत्य उपक्रम वसमत पत्रकार संघाच्या  संपूर्णचमूने राबवून खऱ्या अर्थाने त्यांना मानसिक पाठबळ देऊन पुढील सामाजिक कार्यासाठी एक ऊर्जा दिली आहे. पत्रकार संघाने निवड केलेले सर्व पुरस्कारार्थी या सन्मानासाठी पात्र असून त्यांचा गौरव करताना आज आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले.

          वसमत येथील परभणी रोडवरील प्रसाद मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई वसमत तालुका शाखेच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त दर्पण दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी दुपारी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या  ११  समाजसेवकांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,मानवस्त्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते विविध पुरस्काराने गुणगौरव करण्यात आला.त्या प्रसंगी ते बोलत होते .तसेच अध्यक्षीय सामारोपात्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले   समाजात पत्रकार होणे आणि सातत्याने पत्रकार म्हणून काम करणे वाटते तितके सोपे काम नाही. ज्या व्यक्तीला समाजातील प्रश्न अस्वस्थ करतात तेच पत्रकार होऊ शकतात. त्यामुळे पत्रकारांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना न्याय देण्याची खऱ्या अर्थाने सरकार, प्रशासन आणि समाजाची सुद्धा तितकीच जबाबदारी असल्याचे परखड मत  व्यक्त केले. पुढे बोलताना पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले, पत्रकारांचे नेतृत्व करणारी ही सर्वात मोठी सदस्यसंख्या असणारी पत्रकार संघटना आहे. वसमतचे तालुकाध्यक्ष आणि त्यांच्या टीमने अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवून आपल्या सामाजिक कार्याचा ठसा निर्माण केला आहे. समाजाचे प्रश्न मांडण्याचे काम करण्याबरोबरच समाजात जे प्रसिद्धीपासून दुर्लक्षित आहेत मात्र आपले काम ते प्रामाणिकपणे करून समाज सेवा करत आहेत, अशा व्यक्तिमत्त्वांना देखील शोधून त्यांना प्रकाश झोतात आणण्याचे काम पत्रकारांचे आहे.आणि हेच काम वसमतची टीम अशा सामाजिक पुरस्काराच्या माध्यमातून करत आहे, हे निश्चित कौतुकास पात्र आहे. प्रत्येक व्यक्तीने किमान एका व्यक्तीचे दायित्व स्वीकारून त्याला परीपूर्णपणे घडवून समाजसेवेसाठी उभे केले पाहिजे, हीच खरी समाज सेवा आहे.पत्रकारिता हे काम जोखमीचे आहे. हे काम करतांना खूप पैसा मिळतो हा केवळ भ्रम आहे. पत्रकारांची आर्थिक अवस्था अगदी बिकट आहे. लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी आता सरकारने संवेदनशील होऊन प्रश्नांना न्याय देणे गरजेचे आहे. प्रशासनाने देखील पत्रकारांवर थेट गुन्हे दाखल करून अन्याय करणे थांबवले पाहिजे.शासकीय नियमानुसार मर्यादित संख्येमध्ये आणि कोरोना महामारीचे सर्व नियम निकष पाळून पत्रकार संघाने हा स्तुत्य उपक्रम पार पाडला.

या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे, शिवेश्वर बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार,  शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनील काळे, पत्रकार संघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न गिरीकर,वसमत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू,वसमत वकील संघाचे सचिव अँड.चिंतामणी देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शेख अय्यूब, न.प.गटनेते मैनोदिन संदलजी,सपोनी अशोक जाधव,संपादक बालाजी पालिमकर,जेष्ट पत्रकार सत्यविजय अन्वेकर, मंगलचंद गोरे,आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.


विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेल्या ११ मान्यवरांना मान्यवरांच्या शुभहस्ते शानदार सोहळ्यामध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय क्षेञात नावलौकिक असलेले आरोग्यरत्न पुरस्कार - डाॕ.मारोती क्यातमवार व डॉ. .सन्नाउल्ला खान यांना प्रदान करण्यात आला तर शिक्षण क्षेञातले शिक्षणरत्न पुरस्कार - प्रा.संदीप चव्हाण व प्रा.इकरार खान यांना सन्मानाने देण्यात आला. अभ्यासू साहित्यिक तसेच निर्भीड पञकार म्हणुन ओळख असलेले पञकारीता दर्पण पुरस्कार दै.सकाळचे पञकार संजय बर्दापुरे यांना देण्यात आला. तसेच समाजरत्न पुरस्कार रविंद्र रणधीर तेलगोटे,लघुउद्योग क्षेञातील मानांकित उद्योगरत्न पुरस्कार  बालाजी नारायण तर बँकिंग क्षेञातील सहकाररत्न पुरस्कार  विश्वनाथ देसाई यांना देण्यात आला. सामाजिक व महिला सक्षमीकरन क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या सौ सीमा अ. हाफिज यांना समाजरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले सेवाभावी संस्थारत्न पुरस्कार राजुभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान संस्था व अमन सेवाभावी संस्था यांना देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शालेय विद्यार्थ्यांच्या सुंदर स्वागत गीताने झाली कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रकाश इंगळे यांनी तर आभार पत्रकार संघाचे वसमत तालुका अध्यक्ष फेरोज पठाण यांनी मानले.या कार्यक्रमाला हिंगोली परभणी जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक मान्यवर पत्रकार संपादक तसेच ग्रामीण पत्रकार व पुरस्कारार्थी आपल्या स्नेही व कुटुंबा या समवेत या पुरस्कार सोहळा कार्यक्रमाला उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय बर्दापुरे, वसमत तालुका अध्यक्ष फेरोज पठाण,शेख इस्माइल,अशोक गुंडाळे,प्रा.नामदेव दळवी,दिनेश पालिमकर, शेख अफसर,नासर पठाण,अय्यूब पठाण,शेख खदिर,महावीर आदमाने, शेख इलयास,अनिल पंडित, नवीद अहेमद,शेख़ समिरोद्दीन, खदिर अहेमद,मुनवर फारोखी, आदिनी पुढाकार घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !