MB NEWS-*परळीच्या वैद्यकीय क्षेत्रातील "पितामह" काळाच्या पडद्याआड; जुन्या पिढीतील प्रतिथयश डॉ. दि.ज.दंडे यांचे निधन*

style="font-size: x-large;">*परळीच्या वैद्यकीय क्षेत्रातील "पितामह" काळाच्या पडद्याआड; जुन्या पिढीतील प्रतिथयश डॉ. दि.ज.दंडे यांचे निधन* 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

            परळी शहर , तालुक्यासह मराठवाड्यात सर्वदूर सर्वपरिचित व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर दिगंबर जनार्धन दंडे यांचे आज दि.८ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास परळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परळी शहराच्या वैद्यकीय क्षेत्रातील "पितामह" काळाच्या पडद्याआड गेल्याची शोक संवेदना व्यक्त होत आहे. शहरातील जुन्या पिढीतील प्रथितयश व रुग्णप्रिय डॉक्टर म्हणून डाॅ.दि.ज.दंडे यांची ओळख होती.त्यांच्या निधनामुळे परळीच्या वैद्यकीय क्षेत्रातील जुन्या पिढीतील अनुभवी व्यक्तीमत्व हरवले आहे.

            डॉ. दिगंबर जनार्दन दंडे हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते 85 वर्षे वयाचे होते. त्यांच्या पश्चात डॉ. विवेक दंडे व अॅड.तेजस दंडे ही दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आज दि.८ जानेवारी 2022 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास डॉ. दि.ज. दंडे यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज दि.८  परळी येथे सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.माणिकनगर पश्चिम,अंबाजोगाई रस्त्यावरील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे.

             डॉ. दिगंबर जनार्दन दंडे हे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून परळी शहरात प्रथितयश डॉक्टर म्हणून रुग्णसेवा करत होते. सामाजिक व सांस्कृतिक कार्याची जोड देऊन त्यांनी अविरतपणे रुग्णसेवा करण्यासाठी आपले आयुष्य वाहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात केली. मोहन धारिया यांच्या समवेत त्यांनी विविध माध्यमातून सहयोगी कार्य केले. दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे निष्ठावंत व निकटचे सहकारी म्हणून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, वैद्यकीय क्षेत्रात काम केले.आणीबाणी मध्ये दोन महिन्याचा कारावासही त्यांनी भोगलेला आहे. परळी शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये व सांस्कृतिक वैभव वाढविण्याच्या दृष्टीने सर्व कार्यात त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. डॉ.दि.ज. दंडे हे परळी व संपूर्ण मराठवाड्यात 'हाताला गुण' असलेले डॉक्टर म्हणून परिचित होते. त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येक रुग्णांशी व्यावसायिक नात्यापेक्षा पारंपारिक आत्मीय नाते त्यांनी निर्माण केले. हजारो रुग्ण आजही 'आमचे डॉक्टर' म्हणजे डॉक्टर दंडे असे हक्काने सांगतात यातच त्यांच्या निरपेक्ष रुग्णसेवेची पावती दिसून येते.

              दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या उभारणीत यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. या बँकेचे ते संस्थापक संचालक होते तर पाच वर्षे दीनदयाळ बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द निभावलेली आहे. परळी शहराशी त्यांचा असलेला स्नेहभाव, सुसंस्कृत बाणा, स्पष्टवक्तेपणा व सुह्रदयी डॉक्टर म्हणून ते शहरात सदैव स्मरणात राहणार आहेत. त्यांच्या निधनाने सर्वस्तरातून शोकभावना व्यक्त होत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार