MB NEWS-माईंच्या जाण्याने "अनाथ" शब्दच हरवला -डॉ.शालिनीताई कराड

 माईंच्या जाण्याने "अनाथ" शब्दच हरवला -डॉ.शालिनीताई कराड 



"माई" म्हणजे आई... पद्मश्री सिंधुताई सपकाळ म्हणजे अवघ्या देशाची आई आणि जिला आपण माई म्हणतो. माईंनी गावसतील तेवढे अनाथ माणसं आणि गावसतील तेवढ्या गाई जमा करून त्यांचा सांभाळ केला. ही गोष्ट कोणालाही सोपी अशी नाही. शेकडो गाई आणि हजारो अनाथ सांभाळणारी कोण? तर ती माई? अशा अनेक अनाथांना आधार देणारी माय गेल्याने "अनाथ' हा शब्दच पोरका झाला आहे. डॉ.शालिनीताई कराड यांनी पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या शोकभवना त्यांनी व्यक्त केल्या.

"स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी" ही म्हण सार्थ ठरवणाऱ्या माई आहेत. जगण्याला शॉर्टकट नसतो आणि मृत्यूला लाच देता येत नाही हे माईंचे वाक्य! वास्तविक जगणे त्या जगल्या. लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकभ्यास करता करता त्यांनी डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही हे विशेष. त्या 22 देश फिरल्या परंतु त्यांनी "नववारी" सोडली नाही. जगात भारी "नववारी" ही त्यांची मुलींना शिकवण. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभ असणाऱ्या माईंचे जाणे म्हणजे अवघ्या राज्याला पोरके करून जाणे आहे असे प्रतिपादन डॉ.शालिनीताई कराड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !