MB NEWS-औरंगाबादेत एक कृतज्ञता भावसोहळा........परळीचे भूमीपुत्र असलेल्या डॉक्टरांसाठी

औरंगाबादेत एक कृतज्ञता भावसोहळा........परळीचे भूमीपुत्र असलेल्या डॉक्टरांसाठी 

🕳️ बरे होऊन आलेल्या रुग्णाच्या सत्काराने डॉक्टर्स भावूक 

परळी/प्रतिनिधी

करोनाचा गतवर्षी टिपेला पोहोचलेला संसर्गकाळ. सर्व देशाच्या व्यवहाराची चाके थांबलेली. पत्नीच्या गर्भाशय कर्करोगावर उपचाराची चिंता मन पोखरत असतानाच रेल्वेचे चाक काहीसे हलल्यामुळे औरंगाबादचे शासकीय रुग्णालय गाठता आले आणि तेथील अधिष्ठातांसह परळीचे भूमिपुत्र असलेल्या दोन डॉक्टरांनी केलेले उपचार, मार्गदर्शनातून कर्करोगग्रस्त महिला रूग्णावर यशस्वी उपचार केल्यानंतर आज आजार दूर झाल्यामुळे एका परळीकराने ४ जानेवारी २०२२ रोजी औरंगाबादेत जाऊन मनी दाटून आलेल्या अत्यंत कृतज्ञताभावाने डॉक्टरांचा छोटेखानी सत्कार केला.

अधिष्ठाता डॉ. अरविंद गायकवाड यांच्यासह परळीकर असलेले डॉक्टर अजय बोराळकर व डॉ. महेश रेवडकर यांचा शाल, गुच्छ, प्रभु वैद्यनाथाची प्रतिमा व कंदी पेढे देऊन सत्कार करण्यात आला. 

परळीतील संत सावता महाराज मंदिरानजीकचे रहिवासी नरहरी आसेवार यांच्या पत्नीला गर्भाशयाचा कर्करोग असल्याचे निदान गतवर्षी झाले. उपचाराचे मार्ग असले तरी करोनाचा वाढता संसर्ग, त्यामुळे लागलेले लॉकडाऊन यामुळे आसेवार यांच्यापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, सुदैवाने काही निर्बंधात का होईना पण रेल्वे सुरू झाली. रेल्वेने कसे-बसे औरंगाबादचे राज्य शासकीय कर्करोग रुग्णालय गाठले. उपचार, तेथेच थांबणे, केमोथेरपी, गर्भाशयाची पिशवी काढण्यासाठीची शस्त्रक्रिया, या प्रक्रियेतून जाणे सुरू झाले. या सर्व कठीण काळात उपचारासाठी डॉ. रेवडकर, डॉ. बोराळकरांनी प्रत्यक्ष लक्ष घालण्यासह वेळोवेळी मार्गदर्शन केले. प्रसंगी मनोबलही वाढवले. नियमित उपचार, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार वेळेवर औषधे घेणे, यामुळे आज आजाराच्या विषाणूपासून रुग्ण बराच दूर झालेला आहे.  आज, मंगळवारी तीन महिन्यांच्या नियमित तपासणीत सोनोग्राफीचे रिपोर्टही दिलासा देणारे आले आहेत. त्यानंतर उतराई होण्याच्या भाव मनी दाटला नाही तर नवलच. याच इच्छेतून व डॉक्टरांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठी नरहरी आसेवार यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. महेश रेवडकर व डॉ. अजय बोराळकर यांना त्यांच्या अत्यंत व्यस्त वेळेत एकत्र बोलावून प्रतिमा, गुच्छ, शाल व कंदी पेढे देऊन सत्कार केला. " रूग्ण बरा होऊन घरी परतताना त्याचा व त्याच्या नातेवाईकांचा चेहऱ्यावर दिसणारा आनंदच आमच्यासाठी सर्वोच्च आहे. अशी कृतज्ञता व्यक्त केल्याने कामाची पोच पावती मिळाल्याचे समाधान वाटते." अशा भावना डॉ. गायकवाड, बोराळकर व रेवडकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !