MB NEWS- पौळ पिंपरीत सन्मान “जिजाऊंच्या लेकींचा”

 जिजाऊंचे मातृतीर्थ पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहिल –लक्ष्मण  पौळ

 पौळ पिंपरीत सन्मान “जिजाऊंच्या लेकींचा”


परळी (प्रतिनिधी)

राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी येथे मोठ्या अभिनव पध्दतीने साजरी करण्यात आली. दि.१२ जानेवारी रोजी जयंती निमित्त विशेष अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माँसाहेब जिजाऊ चौकात हा कार्यक्रम घेण्यात आला. जिजाऊंच्या संकल्पनेतून स्वराज्य उभे राहिले, या स्वराज्याला दोन दोन कर्तृत्ववान छत्रपती मिळाले. त्यांच्या विचारांची रूजवन आणि त्यांच्या विचारांची पेरणी स्वराज्यातील प्रत्येक मावळ्यांत होती. पिंपरीत उभारण्यात आलेले मातृतीर्थ पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असून, माँसाहेब जिजाऊंनी पेरणी केलेल्या संस्कारांची आठवन करून देत राहिल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ यांनी केले. जिजाऊ जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

तालुक्यातील मौजे पौळ पिंपरी येथे माँसाहेब जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात कोरोनाच्या काळात विशेष कामगिरी बजावलेल्या महिला योध्यांचा कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सरपंच सौ.शामलताई माणिकराव पौळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास पोहनेर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.निता तोंडगे, तलाठी मोनिका चव्हाण, कृषी सहाय्यक सारिका खेडकर, शिक्षीका श्रीमती काळे, श्रीमती पडलवार, श्रीमती दासूद, सौ.प्रेमा काळे आदींसह अनेक रणरागीणींची विचारमंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीस सकाळच्या सुमारास प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर जिजाऊ चौकात माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आला. उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करीत माँसाहेबांना अभिवादन केले. यावेळी मराठा सेवा संघाचे संजय सुरवसे यांच्या सुमधूर आवाजात जिजाऊ वंदना घेण्यात आली.

मुख्य कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थीनींनी माँसाहेब जिजाऊंच्या चारित्र्यावर प्रकाश टाकणारे भाषणे केली. विद्यार्थीनींच्या भाषणानंतर जेष्ठ नेते उत्तम दादा माने, लक्ष्मण तात्या पौळ, परळी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय काळे, प्रा.दत्तात्रय मोरे यांच्यासह अनेकांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन शिंदे, उपसरपंच सुरेश माने, युवक नेते माणिकराव पौळ, सिरसाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष मिलिंद चोपडे, पत्रकार बाळासाहेब गरड, पांडुरंग काळे, दत्तात्रय डिकले, राजेंद्र काळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जेष्ठ नेते बबन अप्पा पौळ व लक्ष्मण वैराळ यांनी केले.‍

पौळ पिंपरीत उभारण्यात आलेल्या जिजाऊ चौकात माँसाहेब जिजाऊंचा भव्य पुतळा येणाऱ्या काळात ग्रामस्थांच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे. यासाठी गावातील प्रत्येकाने जमेल त्याप्रमाणे वर्गणी देण्याचे वचन आज झालेल्या कार्यक्रमात देण्यात आले. हे मातृतीर्थ येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असून, सिंदखेड राजा प्रमाणे पिंपरीतही पुढील काळात माँसाहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्त भव्य सोहळे आयोजित करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. जिजाऊ जयंती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात कोरोनाच्या पूर्ण नियंमाचे पालन करण्यात आले, याचसोबत ग्रामस्थांसाठी कोव्हीड लसिकरण मोहिमही घेण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार