MB NEWS-पत्नीच्या वाढदिवसाला आरोग्यदायी गिफ्ट; डॉ.शाम काळेंनी दिली कुटुंबासाठी केंजेन-एल्कलाईन वाॅटर मशिन

  पत्नीच्या वाढदिवसाला आरोग्यदायी गिफ्ट; डॉ.शाम काळेंनी दिली कुटुंबासाठी केंजेन-एल्कलाईन वाॅटर मशिन 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

     आजकाल वाढदिवसाच्या निमित्ताने उत्सवी स्वरूप आलेले असताना अनाठायी खर्चाला फाटा देत आपल्या कुटुंबातील सदस्यांना फायदेशीर ठरेल असे वाढदिवसाचे गिफ्ट देत परळीतील डॉ.शाम काळे यांनी अनोखा व अनुकरणीय पायंडा पाडला आहे.पत्नीच्या वाढदिवसाला आरोग्यदायी गिफ्ट म्हणून डॉ.काळेंनी  कुटुंबासाठी केंजेन-एल्कलाईन वाॅटर मशिन दिली आहे.

          सौ. सुशीला शाम काळे यांचा दि.०९/०१/२०२२ रोजी वाढदिवस होता.त्यानिमित्त स्त्रि रोग तज्ञ डॉ. शाम काळे यांनी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरवले.मोठा गाजावाजा, पोस्टरबाजी व इतर सर्व खर्च टाळून कुटुंबासाठी संपूर्ण  आरोग्यवर्धक केंजेन-एल्कलाईन वाॅटर मशिन सप्रेम भेट म्हणून दिली.

आपल्या व कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या भविष्यात होणाऱ्या संभाव्य आजारांपासून बचावासाठी घेतलेल्या दूरदृष्टी निर्णय व वाढदिवसाच्या निमित्ताने   दिलेल्या अनोख्या भेट वस्तू देण्याचा पायंडा पाडल्याबद्दल त्यांचे सर्वत्र आभनंदन होत आहे.

🔸केंजेन-एल्कलाईन वाॅटर काय आहे?

        एनाजिक या प्रसिद्ध जपानी कंपनीचे केंजेन पाणी भारतात खूप लोकप्रिय होत आहे. जगातील आणि भारतातील प्रसिद्ध नेते, अभिनेते, बराक ओबामा, बिल गेट्स, आणि जगातील अव्वल खेळाडू याचा वापर करतात.एनाजिक नावाच्या जपानी कंपनीने पाणी फिल्टर करण्याचे काम करणारे मशीन बनवले आहे. आणि त्या पाण्याला केंजेन पाणी म्हणतात. ही कंपनी सुमारे 45 वर्षे जुनी आहे. या कंपनीने पहिल्या 20 वर्षांत हे पाणी फक्त रुग्णालयांना दिले होते. मात्र आता सर्वसामान्यांना फायदा व्हावा या उद्देशाने ते सर्वांसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. डायबिटीज नियंत्रित करणे, हाडांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवणे,बीपी  नियंत्रित करणे, वजन संतुलन,कैंसर पासून बचाव,अॅसिडिटी संतुलन आदींसह आरोग्यासाठी हे पाणी अतिशय लाभदायक असल्याचे मानले जाते.

        


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार