MB NEWS-परळीच्या ग्रामीण भागात चोरांची दहशत ! इंजेगाव येथे चाकूचा धाक दाखवून माॅर्निंग वाॅकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत,मणी-मंगळसुत्र पळविले

 . परळीच्या ग्रामीण भागात चोरांची दहशत !

इंजेगाव येथे चाकूचा धाक दाखवून माॅर्निंग वाॅकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत,मणी-मंगळसुत्र पळविले


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

      परळी व परिसरात दररोज नोंद होत असलेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे.परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे. परळी तालुक्यातील इंजेगाव येथे दि.९ रोजी सकाळी माॅर्निंग वाॅकला गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत मणी- मंगळसुत्र दोन चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे.अशा घटनांनी नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे.

      सध्याच्या काळात सर्वत्र चोरीच्या घटननांची साखळी खंडीत होत नसल्याने लोकांमध्ये एकप्रकारे मोठा धसका बसलेला आहे.अन्य कोणत्याही बाबींचा विचार न करता चोरीच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाचे प्राधान्य आहे.अशाही परिस्थितीत चोरट्यांची मनस्थिती मात्र बदललेली दिसत नाही.सर्वत्र चोरटे धुमाकूळ घालत आहेत. दररोज चोरीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होत आहे.ही चिंतेत भर टाकणारी बाब ठरत आहे. परळी तालुक्यातील इंजेगाव येथे दि.९ रोजी सकाळी ६.३० वा.सुमारास इंजेगाव-परळी रस्त्यावर माॅर्निंग वाॅकला गेलेल्या एका महिलेला मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी चाकुचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याची पोत मणी- मंगळसुत्र तोडून पलायन केले.दोन चोरटे पोत मणी- मंगळसुत्र घेऊन सोनपेठ रस्त्याने निघुन गेले.याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनि शहाणे हे करीत आहेत.

     


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार