MB NEWS- *ज्योतिषाचार्य पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजींच्या 'गुरूजी आयुर्वेद' चा मंगळवारी शुभारंभ*

style="font-size: x-large;"> *ज्योतिषाचार्य पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजींच्या 'गुरूजी आयुर्वेद' चा मंगळवारी शुभारंभ*

परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा....

      संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले ज्योतिषाचार्य पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक औषधी उपलब्ध होणार आहेत. निरोगी व निरामय जीवनपद्धतीसाठी ज्योतिषाचार्य पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजींच्या 'गुरूजी आयुर्वेद' चा मंगळवारी शुभारंभ होणार आहे.

      पारंपारिक आयुर्वेदाची सेवा  हातून घडावी, आयुर्वेदाची सेवा सर्व सामान्य जनतेला  लाभदायक व्हावी या उदात्त हेतूने ज्योतिषाचार्य पं.अतुलशास्त्री भगरे गुरुजींच्या 'गुरूजी आयुर्वेद' चा मंगळवारी दि.१८ जानेवारी २०२२ रोजी शुभारंभ करण्यात येत आहे.या माध्यमातून समाजातील घटकांचे आयुर आरोग्य निरोगी-निरामय व्हावे यासाठी उत्कृष्ट दर्जेदार शास्त्रशुध्द वनौषधींचा पुरेपूर उपयोग करून या औषधाची निर्मीती गुरूजी आयुर्वेदच्या माध्यमातून समोर आणत आहेत. आज पर्यंत जनता जनार्दनाने आपणांस धार्मिक , अध्यात्मिक , जोतिष्य, कथाप्रवक्ता या विविध क्षेत्रामधून  अतोनात प्रेम, शुभेच्छा, प्रतिसाद भरभरून  दिला आहे. हेच प्रेम संबंध आपल्या शुभेच्छासह या आयुर्वेदाच्या नविन उपक्रमांतून सहकार्यात्मक रूपाने वृदिगंत होवो हिच सदिच्छा असल्याची भावना यानिमित्ताने ज्योतिषाचार्य पं. अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी व्यक्त केली आहे.

          सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भावभाव लक्षात घेता  'गुरूजी आयुर्वेद' शुभारंभाचा कार्यक्रम सरकारी नियमानुसार छोटेखानी स्वरूपात करण्यात येणार आहे.  सर्वांनी  'गुरूजी आयुर्वेद' सेवेचा लाभ घ्यावा तसेच गुरूजी आयुर्वेदची औषधी प्रत्येक घरा घरात  पोहचावी असे आवाहन ज्योतिषाचार्य पं. अतुलशास्त्री भगरे गुरुजी , अखिलेश अतुल भगरे, सौ.मोहिनी अतुल भगरे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार