MB NEWS- *प्रा. अर्चना चव्हाण यांना विद्यावाचस्पती (पीएच -डी.) पदवी बहाल;परळीत सत्कार*

 *प्रा. अर्चना चव्हाण यांना विद्यावाचस्पती (पीएच -डी.) पदवी बहाल;परळीत सत्कार*

 परळी वैजनाथ: एमबी न्युज वृत्तसेवा.....

             जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज मधील मराठी विभाग प्रमुख, प्रा. अर्चना चव्हाण यांनी कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख व संशोधक मार्गदर्शक डॉ राजकुमार यल्लावाड यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी साहित्यातील विनोद एक अभ्यास विशेष संदर्भ स्वातंत्र्योत्तर कालखंडातील निवडक मराठी साहित्य   या विषयावरील शोध प्रबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दाखल केला होता. नुकताच मौखीक परीक्षा झाल्यानंतर  प्रा. अर्चना चव्हाण यांना विद्यापीठाने पीएच-डी. पदवी बहाल केली.मौखीक परीक्षेचे बहिस्थ परीक्षक, प्रा डॉ वर्षा  तोडमल , मराठी विभाग  प्रमुख ,आबासाहेब गरवारे महाविद्यालय , कर्वे रोड ,पुणे  यांची उपस्थिती होती. मौखिक परीक्षेचे अध्यक्ष, डॉ. बा. आं.. म. विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख,डॉ.दासू वैद्य यांनी विद्यापीठाला केलेल्या शिफारशीनुसार प्रा. अर्चना चव्हाण यांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च विद्यावाचस्पती (पीएच -डी )पदवी विद्यापीठाने नुकतीच बहाल केली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. डी. व्ही मेश्राम व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिसभा सदस्य, गोपीनाथराव मुंडे संशोधन केंद्राचे सदस्य,डॉ. पी. एल. कराड यांनी प्रा अर्चना चव्हाण यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ. लक्ष्मण मुंडे,डॉ. रामेश्वर चाटे, यांची उपस्थिती होती. प्रा. अर्चना चव्हाण यांना  पीएच-डी पदवी प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार