MB NEWS-बीडमध्ये सामाजिक न्याय भवनची नवीन इमारत होणार; धनंजय मुंडेंचा निर्णय* *सामाजिक न्याय विभागाकडून 1 कोटी 19 लाख रुपये निधी उपलब्ध*

  *बीडमध्ये सामाजिक न्याय भवनची नवीन इमारत होणार; धनंजय मुंडेंचा निर्णय*




*सामाजिक न्याय विभागाकडून 1 कोटी 19 लाख रुपये निधी उपलब्ध*


मुंबई (दि. 04) --- : बीड येथे सामाजिक न्याय भवनाची नवीन इमारत होणार असून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून यासाठी तातडीने सामाजिक न्याय विभागाकडून 1 कोटी 19 लाख 70 हजार रुपये निधी मंजूर करून वितरित करण्यात आला आहे.


बीड येथील सामाजिक न्याय भवन मध्ये समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, सुनावणी कक्ष, जात पडताळणी तसेच विभागांर्गतच्या विविध महामंडळाची कार्यालये एकाच इमारतीमध्ये आहेत. त्यामुळे प्रशस्त नवीन इमारत उभारणी करण्याचा ना. मुंडे यांचा मानस होता.


त्यानुसार ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सदर निधी उपलब्ध करून दिला असून, लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. 


सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून धनंजय मुंडे यांनी या खात्याच्या माध्यमातून अनेक विकासकामे बीड जिल्ह्यात आणली आहेत. आपल्या बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ सुरू करून नोंदणी करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. 


त्याचबरोबर बरदापुर ता. अंबाजोगाई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधी, परळी शहरातील भीम नगर येथे बुद्धविहार उभारणी साठी 15 कोटी रुपये यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात निधी उपलब्ध करून दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !