MB NEWS-रमाई आवास योजनेतून नाथऱ्याच्या 14 घरकुलांना मंजुरी* *जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वितरित*

  *रमाई आवास योजनेतून नाथऱ्याच्या 14 घरकुलांना मंजुरी*

*जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वितरित*


परळी (दि. 31) : रमाई आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन 2019-20 अंतर्गत परळी तालुक्यातील नाथरा येथील आणखी 14 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, सदर मंजुरी आदेशांचे जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते संबंधित लाभार्थींना वितरण करण्यात आले. गावातील आणखी पात्र लाभार्थींना घरकुल मंजूर करून देण्यात येणार असल्याचे यावेळी श्री अजय मुंडे म्हणाले.


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मार्फत मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकांतील गरजू कुटुंबांचे स्वतःचे हक्काचे घर उभारण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. 


बीड जिल्ह्यात मागील वर्षी ग्रामीण व शहरी भागातील सुमारे 8000 घरकुलांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात आला होता तर यावर्षी ग्रामीण व शहरी मिळून महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 15 हजार घरकुलांना मंजुरी देण्याच्या उद्दिष्टाला मान्यता देण्यात आली आहे.


दरम्यान नाथरा गावासह परळी तालुक्यातील पात्र असलेल्या प्रत्येकाला घरकुल योजनेतून स्वतःचे घर उभारता यावे, यासाठी ना. धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे श्री. अजय मुंडे यांनी म्हटले, तसेच घरकुलांना मंजुरी मिळालेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !