MB NEWS-कन्हेरवाडी - जलालपूर 33/11 केव्ही उपकेंद्राचे काम पूर्णत्वाकडे; चाचण्या यशस्वी-वीजेचा लपंडाव थांबणार पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने काम पूर्ण

  कन्हेरवाडी - जलालपूर 33/11 केव्ही उपकेंद्राचे काम पूर्णत्वाकडे; चाचण्या यशस्वी-वीजेचा लपंडाव थांबणार



पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने काम पूर्ण



परळी वैजनाथ- पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार, नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवा नेते माणिकभाऊ फड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे परळी शहरातील काळरात्री देवी येथील सबस्टेशन व संगम सबस्टेशनचा लोड कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या कन्हेरवाडी - जलालपूर 33/11 केव्ही उपकेंद्राचे काम पूर्णत्वाकडे आले असून, या केंद्रांवरून कन्हेरवाडी, जिरेवाडी, भोपळा बँक कॉलनी, समता नगर, शंकर पार्वती नगर, सोमेश्वर नगर, शारदा नगर व परिसरातील आदी भागात अखंडित वीज पुरवठा करण्यात येणार आहे. 



उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनाच्या दिवशी या उपकेंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर सदर उपकेंद्रचे वेगाने काम पूर्ण करण्यात आले असून आवश्यक चाचण्या देखील करण्यात आल्या आहेत. 

येत्या काही दिवसातच या केंद्रांवरून अखंडित वीज पुरवठा सुरू होणार असून गावासाठी व शेतीसाठी वेगळे, असे स्वतंत्र फिडर देण्यात येत आहेत. यामुळे जुन्या सबस्टेशन वरील ताण देखील कमी होणार आहे तसेच पर्यायाने कन्हेरवाडी, कन्हेरवाडी नवीन वस्ती, धेवाडा, भोपळा हे गावासाठी व शेती साठी स्वतंत्र असे फिडर देण्यात येत आहे. जिरेवाडी समता नगर, शंकर पार्वती नगर, बँक कॉलनी, प्रिया नगर, जलालपूर आदी आदींना शेती व गावासाठी स्वतंत्र फिडर देण्यात येत आहे. त्याचबरोबर आयटीआय कॉलेज, विश्रामगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, वैद्यनाथ कॉलेज, न्यायालय, सिंचन भवन आणि तहसील या भागात तिसरे स्वतंत्र फिडर देण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणच्या वीज ग्राहकांना 24 तास वीज पुरवठा होणार आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार