MB NEWS-◆ श्री.हिंगलाज माता मंदिर येथे होणार सामाजिक सभागृह; ना.धनंजय मुंडे यांनी केले 53 लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन ◆

 ◆ श्री.हिंगलाज माता मंदिर येथे होणार सामाजिक सभागृह; ना.धनंजय मुंडे यांनी केले 53 लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन ◆

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      परळी शहरातील शंकर पार्वती नगर येथील श्री.हिंगलाज माता मंदिर येथे राज्याचे सामाजिक न्याय व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या हस्ते 53 लक्ष रुपये प्रकल्प खर्च असलेल्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन गुरुवार दि 03 रोजी  करण्यात आले.

 

        परळी शहरात ना.धनंजय मुंडे  यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून अनेक बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात आले असून अनेक सभागृह प्रगतीपथावर आहेत.ज्योतिर्लिंग नगरी परळी मध्ये धार्मिक व अध्यात्मिक,आरोग्यविषयक उपक्रमांसाठी सदर सभागृह उपयुक्त ठरत आहेत व प्रत्येक समाज घटकाला आपले हक्काचे दालन निर्माण होत आहे.

 गुरुवार दि 03 रोजी शहरातील शंकर पार्वती नगर मधील भावसार समाजाचे दैवत असलेल्या श्री.हिंगलाज माता मंदिर येथील सभागृहाचे  भूमिपूजन ना.मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मीक अण्णा कराड, तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, भावसार समाज परळीचे अध्यक्ष प्रभाकरराव हजारे, माजी नगरसेवक भालचंद्र तांदळे, श्रीराम गुंडाळे , गोपाळराव तांदळे, प्रकाश कुसुमकर, अॅ. अतुल तांदळे, गोपाळ कंकाळ, वैजवाडे शैलेश,सेवलकर संजय,आदि समाज बांधव उपस्थित होते..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !