MB NEWS-खोटे अट्रोसिटी गुन्हे मागे घ्या-सकल मराठा समाजाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

  खोटे अट्रोसिटी गुन्हे मागे घ्या-सकल मराठा समाजाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

       गेल्या दीड वर्षभरात परळी तालुक्यातील मौजे दादाहरी वडगाव येथे अनेक खोटे अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गावात कुठल्याही जातीच्या व्यक्तीचा इतर कुठल्याही माणसाचा द्वेष नाही. सर्वजण एकोप्याने राहतात. मात्र काही गावाबाहेरील नेतेमंडळी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी समाजा-समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. खोट्या केसेस दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज परळीत सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी लावून धरण्यात आली. 

गुन्हा दाखल नंतर होतो आणि आरोपी अगोदर अटक केला जातो हा प्रकार संशयास्पद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे एकतर्फी वागणे चुकीचे असून शहानिशा न करता गुन्हे दाखल करून घेण्याचा प्रकार चुकीचा आणि निषेधार्य आहे. गणेश शिंदे हा व्यक्ती अपंग असून कुठलीही चूक नसतांना त्याच्यावर खोटा अट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रत्यक्ष वयक्तिक प्रॉपर्टीचा वाद असून, यात मा.न्यायालयाने मनाई हुकूम काढलेला आहे. खोटे गुन्हे दाखल करून समाजा-समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना वेळीच चाप बसला पाहिजे अशी अपेक्षा मराठा आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर खोट्या गुन्ह्यांमध्ये दोषी असलेल्या लोकांवर कारवाई करावी व फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !