MB NEWS-चोरांची नविन ट्रीक-आता मोटारसायकली सोडून बॅटर्यांची चोरी

चोरांची नविन ट्रीक-आता मोटारसायकली सोडून बॅटर्यांची चोरी 

परळीत चोरीचे सत्र सुरूच 

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         परळी व तालुक्यात गुन्हेगारी करणारांना मोकळे रान मिळाले आहे.कोरोनाकाळात उत्पन्नाचे सर्व स्त्रोत बंद झाले आहेत.प्रत्येकजण यातूनच जात आहे.मग चोर, चोरटे आणि भुरटे चोर यांचीही प्रचंड विवंचना झालेली आहे. त्यामुळे संधी दिसताच डल्ला मारण्यासाठी चोरटे आसुसलेले आहेत.विविध ठिकाणांहून अनेकांच्या मोटारसायकली मोठ्या प्रमाणावर चोरीला जात असल्याचे सत्र सुरू असतानाच चोरांची नविन ट्रीक समोर आली आहे.  मोटारसायकल किंवा वाहनं सोडून चोरट्यांनी या वाहनांच्या बॅटर्यांच्या चोर्यांचा धडाका लावला आहे. 

          शहरातुन व ग्रामीण भागातून मोटारसायकलींची    चोरी होण्याचे सत्र सुरू असल्याचे दिसून येते. सर्वत्र चोरीच्या घटना वाढल्या असल्याने यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. चोरट्यांचे सत्र सुरू असतानाच चोरांची नविन ट्रीक समोर आली आहे.  मोटारसायकल किंवा वाहनं सोडून चोरट्यांनी या वाहनांच्या बॅटर्यांच्या चोर्यांचा धडाका लावला आहे. तेलघणा या.अंबाजोगाई येथील फिर्यादी गोविंदा संतराम सिरसाट यांच्या मोटारसायकलमधील बॅटरी तसेच साक्षीदार  वैजनाथ रावन केंद्रे यांच्या ट्रॅक्टर मधील बॅटरी अज्ञात चोरांनी चोरुन नेल्या. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.ना.वाले हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !