MB NEWS-शिस्तप्रिय मुख्याध्यापिका छाया नाईक- कुलकर्णी सेवानिवृत्त

  शिस्तप्रिय मुख्याध्यापिका  छाया  नाईक- कुलकर्णी सेवानिवृत्त


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.......

     परळी शहर व परिसरात एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका व जि.प.प्रा.शाळा दाऊतपूर या.परळी वै. येथील शिस्तप्रिय मुख्याध्यापिका  छाया  नाईक- कुलकर्णी नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या आहेत. यानिमित्ताने त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

       जि.प.प्रा.शाळा दाऊतपूर ता.परळी वै.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती छाया वामनराव नाईक (कुलकर्णी),39 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर 31-01-2022 ला सेवानिवृत्त झाल्या. याप्रसंगी शाळेत सेवागौरव कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी केंद्रप्रमुख श्री पल्लेवाड सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यांचा सेवाप्रवास तांदळवाडी, नेकनुर,येळंबघाट,मांजरसुबा व परळी असा ग्रामीण भागातून झाला.,सेवाकालावधीत सामाजिक बांधीलकी जपत विविध शैक्षणिक उपक्रम राबवले. त्यासाठी त्यांना जि.प.बीडचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला.ओपन हार्ट सर्जरी झालेली असताना प्रबळ इच्छाशक्ती, सतत हसतमुख, प्रचंड आत्मविश्वास असल्याने उत्कृष्ट शैक्षणिक कार्यामुळे त्या परिसरात शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून ज्ञात आहेत. याप्रसंगी  दाऊतपुर चे सरपंच श्रीकांत फड ,शाळा व्य.समिती अध्यक्ष श्री महादेव गडदे,शिक्षक-शिक्षिका, नातेवाईक व मित्र परिवार या सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !