MB NEWS-थर्मल मधील भंगार चोरीच्या तपासात तीन आरोपी लागले पोलिसांच्या हाती; अनेक चोर्यांचा उलगडा होण्याची शक्यता

थर्मल मधील भंगार चोरीच्या तपासात तीन आरोपी लागले पोलिसांच्या हाती; अनेक चोर्यांचा उलगडा होण्याची शक्यता

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
       गेल्या महिन्यात १८ जानेवारी रोजी थर्मल मधील भंगार साहित्याची चोरी झाली होती. या चोरीच्या तपासासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक मारोती मुंडे यांनी गांभीर्याने घेत तपास सुरू केला.या अनुषंगाने दिनांक 07/02/2022 रोजी सायंकाळी  पोना केकाण पेट्रोलिंग करीत असताना थर्मल परीसरात सेलू रोडने दोन ईसम हातात पोते घेवून जाताना  दिसुन आले.त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले व तपास केला असता आणखी एक आरोपी निष्पन्न झाला.या तपासात तीन आरोपी  पोलिसांच्या हाती लागले आहेत. अधिक तपासात अआणखी चोरटे व अन्य चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
     याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार,  थर्मलचे कनिष्ठ सुरक्षा अधिकारी  विजय अच्युतराव मुंडे यांनी दि.१९ जानेवारी २०२२ रोजी फिर्याद दिली होती.
दिनांक 18/01/2022 रोजी सायंकाळी  ४ वा.ते दिनांक 19/0/2022 रोजी सकाळी ८ वा. पर्यंत डयूटी होती. सायंकाळी 06.00 सुमारास फिर्यादीव सोबत सुरक्षा गार्ड अंकुश पवार, विष्णु केन्द्रे वाहन क्रमांक MH-44 0506 श्रीरंग केन्द्रे असे  थर्मल परीसरात गस्त घालत असताना  कुलींग वाटर परीसरातील स्क्रॅप ( डॅमेज झालेले ) मटेरीयलकडे जावून पाहणी करून आले. त्यानंतर  परत रात्री १० वा.  कुलींग टावर परीसरातील स्क्रॅप मटेरीयलकडे जावुन पाहीले असता त्याठिकाणी स्क्रॅप मटेरीयल मधील अंदाजे 5 क्विटल किमत अंदाजे 15000 रुपयाचे स्क्रॅप मटेरीयल चोरी गेल्याचे समजले. या मजकुराचे फीर्यादी वरुन ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास प्र.पो.नि.मारोती मुंडे यांनी सुरु केला. 
         दिनांक 07/02/2022 रोजी सायंकाळी पोस्टे हद्दीत पोना केकाण पेट्रोलिंग करीत असताना थर्मल परीसरात सेलू रोडने दोन ईसम हातात पोते घेवून जाताना  दिसुन आले.त्यांना थांबवून त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी 1. बंडु लक्ष्मण जोगदंड वय 40 वर्ष रा. भोपा ता. धारूर जि. बीड 2. शेख अन्वर शेख नर वय 35 वर्ष रा. इंदिरा नगर पाथरी ता. पाथरी जि. परभणी असे सांगितले त्यांना येथे येण्याचे कारण बाबत विचारपुस केली असता ते उडवा उडविचे उत्तर देवू लागले व तेथे थोडयाच अंतरावर एक टाटा मॅजीक घांबलेली दिसली व तेथुन तीन ईसम पळून गेले. त्यानंतर  त्या दोघांना ताब्यात घेवुन टाटा मँजीक गाडी त्यामध्ये अंदाजे 50 क्वि. भंगारसह पोलीस ठाण्यात आणुन त्यांच्याकडे अधीक विचारपूस केली. त्यांनी हा गुन्हा  केल्याचे कबुल केले.
          अटक करण्यात आलेल्या आरोपींनी या गुन्हयातील माल जप्त टाटा मैजीक मध्ये चोरुन नेवून तो माल परळीतील भंगार दुकाणदार अफारोज मुसा पठाण व अमजद मुसा पठाण यांना विक्री केले असल्याचे सांगितले. त्यानंतर भंगार दुकाणदार अमजद मुसा पठाण यास ताब्यात घेण्यात आले. दिनांक 08/02/2022 रोजी यातील आरोपीस गुन्हयाचे तपासकामी 07 दिवस पोलीस कोठडी मिळणेकामी कोर्टात हजर केले असता यातील अटक आरोपीस  न्यायालय परळी वै. यांनी 01 दिवस पोलीस कोठडी मंजूर केली. दिनांक 09/02/2022 रोजी लॉकअप मधील अटक आरोपी अमजद मुसा पठाण यास लॉकअप बाहेर काढुन गुन्हयातील गेला माल बाबत विचारपुस करता आरोपीने गुन्हयातील भंगार माल विकत घेतला आहे असे कबुल केल्याने तो माल पंचनामा करुन जप्त करण्यात आला आहे.ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि मारुती,डिबीपथकातील पो.ना. केकान,जमादार केंद्रे,पो.शि. येरडलावार, पांचाळ यांनी या तपासकामी चांगली कामगिरी केली आहे.
         अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आणखी बर्याच गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.अनेकवेळा विविध ठिकाणी होणाऱ्या भंगार चोरीच्या घटनांमध्ये या आरोपींचा सहभाग आहे का? याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !