MB NEWS- *कोविडमुळे स्थगित राहिलेले 'संत रविदास पुरस्कार' या वर्षी घोषित करणार - धनंजय मुंडे*

 कोविडमुळे स्थगित राहिलेले 'संत रविदास पुरस्कार'  या वर्षी घोषित करणार - धनंजय मुंडे*




*संत रोहिदास महाराजांनी देशाला सामाजिक व आध्यात्मिक उंचीवर नेले - ना. मुंडे*


*संत रोहिदास (रविदास) महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे पुण्यात अभिवादन*



*चर्मकार समाजातील तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेणार - ना. मुंडे*

पुणे, दि.१६ :- स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महान संत रोहिदास (रविदास) महाराज यांच्या नावाने सामाजिक न्याय विभागामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय 'संत रविदास पुरस्कार' कोविड मुळे गेली दोन वर्षे स्थगित होता, या पुरस्कारांची या वर्षी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुणे येथील कार्यक्रमात दिली.



संत रोहिदास (रविदास) महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी शिवशंभूनगर, कात्रज, पुणे येथील गुरु रविदास महाराज मंदिरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आयोजित जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


प्रत्येक समाज घटकाला समान वागणूक मिळावी, जाती-पातीच्या भिंती कोसळून एकमेकांप्रति प्रेम व आदरभाव निर्माण व्हावा या महान विचारसरणीचा संत रोहिदास महाराजांनी भक्तिमार्गाने देशभरात प्रचार आणि प्रसार करून देशाला सामाजिक व आध्यात्मिक उंचीवर नेऊन पोचवले, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

. 🔸MB NEWS ला नक्की Subscribe करा. https://youtube.com/channel/UCrcd4hE8kzoLp5Q67-0nFeg

सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळामार्फत राज्यातील तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात येत असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच महामंडळाचे भागभांडवल यावर्षी पासून वाढविण्यात येणार असून, याची अधिकृत घोषणा लवकरच होईल, असेही ते पुढे बोलताना म्हणाले. महामंडळाच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची यावेळी त्यांनी माहिती दिली. 



यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, उपायुक्त उमेश सोनवणे, नगरसेवक प्रकाश कदम, अखिल भारतीय रविदाशिया धर्म संघटनेचे अध्यक्ष संजय खामकर, रतनलालजी सोनाग्रा यांसह आदी उपस्थित होते. कार्यक्रमात संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना विविध पुरस्कार वितरित करण्यात आले.


कार्यक्रमस्थळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांसाठी पुस्तकांचे दालन ठेवण्यात आले, तसेच बार्टीच्यावतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.



*

*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !