इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-होतकरू महिलेस शिलाई मशिन देऊन खा.प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस साजरा

होतकरू महिलेस शिलाई मशिन देऊन खा.प्रितमताई मुंडे यांचा वाढदिवस साजरा



परळी, प्रतिनिधी.....खा.प्रितमताई मुंडे यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता समाजातील होतकरू,वंचीत गरीब लोकांना मदत करून वाढदिवस साजरा करा असे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते.

MB NEWS ला नक्की Subscribe करा आणि जाणून घ्या दिवसभराच्या घडामोडींचा आढावा.

पंकजाताई मुंडे व खा.प्रितमताई मुंडे या वेळोवेळी कार्यकर्त्यांना अवाजवी खर्च टाळून गोरगरीब, होतकरू,वंचीत लोकांपर्यंत पोहचून त्यांना मदत करण्याचे सदैव आवाहन करतात.

आवर्जून बघा: खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केलेले वाढदिवसानिमित्त चे आवाहन.

  खा.प्रितमताई मुंडे यांच्या आव्हानाला साद देत भारतीय जनता युवा मोर्चाचे अरुण पाठक,योगेश पांडकर,गोविंद चौरे,प्रल्हाद सुरवसे,सुशील हरंगुळे,बाळू फुले,नितीन मुंडे,वैजनाथ रेकने,रवी वाघमारे,गजानन गित्ते,शाम गित्ते,पवन तोडकरी यांनी फुल नाही फुलाची पाकळी मदत म्हणून परळी शहरातील शास्त्री नगर येथील सौ.आशा महेश सदरे या होतकरू महिलेस शिलाई मशीन देऊन वाढदिवस साजरा केला.यावेळी सौ.आशा महेश सदरे यांच्या परिवाराने व शास्त्री नगर येथील महिलांनी खा.प्रितमताई मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आशिर्वाद दिले.

MB NEWS च्या YouTube channel ला नक्की Subscribe करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!