MB NEWS-संपादक ज्ञानोबा सुरवसे यांनी लिहिलेलावाढदिवस विशेष लेख:खा. डॉ. प्रितमताई मुंडे : विकासाची दृष्टी असलेले संवेदनशील नेतृत्व

  खा. डॉ. प्रितमताई मुंडे : विकासाची दृष्टी असलेले संवेदनशील नेतृत्व



       राजकारणात प्रत्यक्ष काम काम करण्यापेक्षा काम केल्याचे दाखवुन चमकोगिरी करणारांची संख्या वाढली आहे. स्वतः काम करण्यापेक्षा इतरांनी केलेले काम आपल्या नावे खपवून श्रेय घ्यायचे आणि स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. 'काम हजाराचे आणि फोटो दहा हजाराचे' असे 'सेल्फी'बाज पुढाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र अशा गर्दीतही आपले स्वतंत्र अस्तित्व आणि वेगळी ओळख ठेवून काम करणारे मोजके राजकारणी, लोकप्रतिनिधी आहेत... त्यापैकी एक म्हणजे खा. डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे!



         कोणताही बडेजाव न करता जेवढी करता येतील तेवढी जनतेची कामे करायची आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा वसा चालू ठेवायचा याच भूमिकेतून त्यांची जनसेवा आणि विकासाचा ध्यास अविरत सुरू आहे. अपघाताने जरी राजकारणात आल्या असल्या तरी स्वकर्तृत्वाने आपली अल्पावधीतच त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकारणाचे बाळकडू घरातच मिळाले असले तरी विकासाची दृष्टी मात्र त्यांनी मेहनतीने प्राप्त केली आहे. मोठी बहीण भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली त्यांनी विकास गंगा बीड जिल्ह्य़ात खेचून आणली आहे. अनेक प्रलंबित प्रश्न अथक पाठपुराव्याने मार्गी लावली आहेत. कोणत्याही विभागाच्या विकासासाठी आवश्यक असते ते दळणवळण, वीज आणि पाणी... खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी याच मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला आणि त्यांच्या मेहनतीची फळे आता मिळू लागली आहेत. आगामी काळात बीड जिल्हा पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सुजलाम सुफलाम होईल. यात तिळमात्र शंका नाही.



रेल्वे मार्गाने जिल्हावासियांची स्वप्न पुर्ती

         परळी - बीड - नगर हा रेल्वेमार्ग म्हणजे बीड जिल्हावासियांचं स्वप्न! हे स्वप्न दाखवुन अनेक प्रस्थापित राजकारण्यांनी वर्षोनुवर्षे निवडणूक जिंकून सत्ता मिळवली, पण एक मिटरही रेल्वेरूळ आंथरू शकले नाहीत. अनेकांच्या पिढ्या या स्वप्नावर राजकारणात स्थिरावल्या... पण कुणीही हा मार्ग पुर्ण व्हावा यासाठी प्रयत्न केले नाहीत. मात्र खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी पहिल्यांदा निवडुन आल्यापासून या रेल्वे मार्गाच्या पुर्ततेसाठी स्वतःला वाहुन घेतले. निवडणूक जिंकण्यासाठीचा हक्काचा प्रश्नच त्यांनी मार्गी लावला आहे. त्यामुळे आता काय टीका करावी? असा विरोधकांनाही प्रश्न पडला आहे.

     बरेच जण विनोदाने प्रितमताईंना म्हणतात 'निवडणूकीचा महत्वाचा मुद्दाच तुम्ही मार्गी लावला, आता लोकांना काय सांगणार?' यावर प्रितमताईंचं उत्तर असतं 'निवडणूक जिंकण्यासाठी प्रश्न लटकत कशामुळे ठेवायचा? जनतेने ज्या कामासाठी निवडून दिले ते काम मी प्रामाणिकपणे करणार आहे आणि रेल्वे मार्ग पुर्ण झाला तरी अनेक विकासाची कामे आहेतच की करण्यासारखी' एवढे प्राणिक वागणारे नेते खुप कमी आहेत. प्रितमताई अगदी स्पष्ट बोलुन विषय मार्गी लावतात. त्यांना राजकारणातले छक्के पंजे जमत नाहीत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

हे आवश्य पहा: खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले वाढदिवसानिमित्त आवाहन.  https://youtu.be/uuPe3J7NVK4

         परळी - बीड - नगर हा रेल्वेमार्गाचा प्रश्न मार्गी लावुन खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी अनेक राजकारण्याची रोजी-रोटी बंद केली आहे. एकाच मुद्द्यावर अनेक वर्षे राजकारण करणारांची दुकाने लावली आहेत. हा ऐतिहासिक प्रश्न मार्गी लावुन इतिहास निर्माण केला आहे. यासाठी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संबंधित रेल्वे मंत्री यांच्या वेळोवेळी भेटी घेऊन हा मार्ग किती महत्वाचा आहे नागरीकांच्या जिव्हाळ्याचा आहे हे पटवून दिले. त्यामुळेच या मागणीसाठी भरघोस निधी मिळत गेला आणि कामाला गती मिळत गेली. बीड जिल्ह्याने धावणारी खरोखरची रेल्वे याची देही याची डोळा बघितली आणि आयुष्याचे पांग फिटले! पिढ्या न पिढ्या पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारल्याने बीड जिल्हावासियांचा आनंद अगदी ओसंडून वाहताना बघायला मिळाला... जे कधी पुर्ण होईल किंवा नाही असे वाटत असणारे स्वप्न पूर्ण झाले आहे. येत्या काळात लवकरच हा रेल्वे मार्ग पुर्ण होऊन विकासाचा महामार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्यासारखे सचोटी आणि चिकाटीने काम करणारे नेतृत्व संसदेत असायलाच हवे.



विकासाची दृष्टी असलेले संवेदनशील नेतृत्व

          खा. डॉ. प्रितमताई मुंडे या केवळ उच्च शिक्षीत आहेत असेच नाही तर त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. दळणवळणाची सुविधा असल्याशिवाय विकासाला गती येत नाही हे ओळखून त्यांनी जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वेळोवेळी भेटी घेऊन जिल्ह्यातील रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून घेतला आहे. जिल्हयात चौपदरीसह अंतर्गत रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. राज्यात समविचारी सरकार नसतानाही थेट केंद्राकडून निधी आणुन रस्ते विकासाच्या कामाला गती दिली आहे.

       विशेष म्हणजे हा निधी आणताना किंवा आल्यानंतरही त्याची प्रसिद्धी करत नाहीत. निधी आणुन विकास करणे हे आपले कर्तव्य आहे त्यात फुशारकी कशाला मारायची? असा त्यांचा प्रश्न असतो. इथे दुसर्‍याने केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी धडपड करणारे नेते आहेत, दुसर्‍याच्या कामाची उदघाटने करणारे नेते आहेत प्रितमताई मात्र आपले काम हे कर्तव्यभावणेने करताना दिसतात.

      लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा वसा चालवताना खा. डॉ. प्रितमताई मुंडे कुठेही कमी पडत नाहीत. जिल्ह्याच्या प्रत्येक भागात त्यांच्या विकासाचा निधी पोहचला असुन प्रत्येक गावात त्यांचे काम आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्यांचा थेट गावात संपर्क आहे. विशेष म्हणजे शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या सतत आग्रही असतात. एरवी शांत, संयमी असणाऱ्या प्रितमताई संसदेत बोलताना, जनतेचे प्रश्न मांडताना मात्र आक्रमक होताना दिसतात. त्यामुळेच संसदेत बोलण्याची त्यांना वेळोवेळी संधी मिळते. ओबीसी प्रश्न, मराठा आरक्षण असो महिलांच्या समस्या प्रत्येक विषयावर अगदी मुद्देसूद भाषण असते.

     खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या रूपाने बीड जिल्ह्य़ाला अतिशय अभ्यासू, संवेदनशील आणि विकासाची दृष्टी असलेला खासदार मिळाला आहे. त्यांचे भविष्यही उज्ज्वल आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे मनापासून अभिष्टचिंतन आणि शुभेच्छा...

-ज्ञानोबा सुरवसे

परळी वैजनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !